Home » Blog » BJP MLA Suspended: भाजपच्या १८ आमदारांचे निलंबन

BJP MLA Suspended: भाजपच्या १८ आमदारांचे निलंबन

‘हनी ट्रॅप’वरून कर्नाटक विधानसभेत प्रचंड गोंधळ

by प्रतिनिधी
0 comments
BJP MLA Suspends

बेंगळुरू : मंत्री आणि राजकारण्यांवर होणाऱ्या कथित हनी ट्रॅप प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करत भाजपच्या आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला. वारंवार आवाहन करूनही शांतता न पाळल्याबद्दल भाजपच्या १८ आमदारांवर निलंबनाची कारवाईकरण्यात आली. सभापती यू. टी. खादर यांनी त्यांना सहा महिन्यांसाठी निलंबीत केले.(BJP MLA Suspended)

हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून शुक्रवारी (२१ मार्च) भाजप आणि जनता दला (एस)च्या आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला. सभापतींनी वारंवार शांततेचे आवाहन केले. मात्र या सदस्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटी त्यांना निलंबीत करण्यात आले. खादर यांच्या आदेशानंतर, सर्व निलंबित आमदारांना जबरदस्तीने सभागृहाबाहेर काढण्यात आले. (BJP MLA Suspended)

कर्नाटकचे मंत्री एम.बी. पाटील यांनी आमदारांना निलंबित करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. या आमदारांनी विधानसभेच्या कामकाज पद्धतीचे उल्लंघन केले. ‘सदस्यांचे वागणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई योग्यच आहे, असे पाटील म्हणाले.

हनी ट्रपच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन दिले असतानाही, भाजप आणि जेडी(एस) चे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये घुसले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.

गुरुवारी, सहकार मंत्री के.एन. राजन्ना यांनी विधानसभेत बोलताना त्यांच्यासह किमान ४८ नेत्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचा दावा केला. (BJP MLA Suspended)

त्यावर बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणात जे सहभागी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यात गुंतलेला कुणी कितीही मोठा असो तो जबाबदारीपासून वाचणार नाही. सरकार या प्रकारणाची सखोल चौकशी करेल आणि आवश्यक ती कारवाई करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

‘‘राजण्णा यांनी त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सभागृहात माहिती सांगितली. त्यावर मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी आधीच उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे सांगितले. राजण्णा यांना तक्रार दाखल करू द्या. तरीही भाजप आणि जेडीएस आमदार गोंधळ घालत होते. ज्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे त्यांना त्यानुसार शिक्षा झाली पाहिजे,’’ असे ते म्हणाले. (BJP MLA Suspended)

‘राज्यातील सर्व नागरिकांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. आम्ही उच्चस्तरीय चौकशी सुनिश्चित करू.’ हनी ट्रॅपच्या प्रयत्नामागे कोण आहे ते शोधून काढण्यात येईल, असे आश्वासन सिद्धरामय्या यांनी दिले. राजण्णा यांनी तक्रार दाखल करण्याचा हेतू व्यक्त केला होता. चौकशीची विनंती केली होती, परंतु अद्याप ती औपचारिकपणे सादर केलेली नाही, असे गृहमंत्री गृहमंत्री परमेश्वर यांनी स्पष्ट केले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00