मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी होणाऱ्या भाजपने तीन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी यांना उमेदवारी मिळाली आहे. उद्या सोमवारी (दि.१७) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. (BJP list)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला आहे. आमशा पाडवी, राजेश विटेकर, प्रविण दटके, गोपीचंद पाडळकर, रमेश कराडे हे विधान परिषद सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. (BJP list)
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विधान परिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी रविवारी उमेदवारांची घोषणा केली. पाच जागांसाठी निवडणूक होणार असून तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. त्यामध्ये आज भाजपने संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी दिली आहे. (BJP list)
दादाराव किचे यांच्या आर्वी विधानसभा मतदारसंघातून सुमित वानखेडे हे आमदार झाले आहेत. त्यामुळे किचे यांना विधान परिषदेवर संधी दिले जात असल्याचे सांगितले जात आहे. संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असून ते फडणवीस यांच्या नागपुरात स्थानिक पातळीवर काम करतात. त्यामुळे यावेळी जोशी यांची वर्णी लागली आहे. (BJP list)
यापूर्वी देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री होते तेव्हा उप मुख्यमंत्री कार्यालयाच मानद सचिव म्हणून जोशी काम पहात होते. २०१९ मध्ये जोशी यांना भाजपने विधान परिषदेची उमदेवारी दिली होती. पण ते पराभूत झाले होते. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदार संघात ते पराभूत झाले होते. या जागेवर भाजपने जवळपास २७ वर्षे विजय मिळवला होता. नागपूर महानगरपालिकेत तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून काम करत असताना संदीप जोशी आणि तुकाराम मुंडे वाद झाला होता. (BJP list)
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सोमवारी १७ रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. १८ मार्चला छाननी होणार आहे. २० मार्चला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. २७ मार्चला मतदान होईल तर सायंकाळी पाच वाजता निकाल जाहीर होणार आहे. (BJP list)
हेही वाचा :
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते
पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना एकत्र येण्याची साद!