Home » Blog » औषधी कारले 

औषधी कारले 

औषधी कारले 

by प्रतिनिधी
0 comments
Bitter melon

कारले ही द्विलिंगाश्रयी शाखायुक्त वेलवर्गीय वनस्पती असून तिच्या खोडांवर खाचा असतात. सडपातळ आणि लांबट तणावांच्या आधाराने ही वेल वर चढते. या वणस्पतीचे शास्त्रीय नाव ‘मोमिर्डिका कँरेंशिया’ होय. इंग्रजीत याला ‘बिटर गुर्ड’ म्हणतात. तर हिंदीमध्ये याला ‘करेला’ म्हणतात. कारल्याचा भाजीसाठी वापर होत असला तरी त्याचे ओषधी गुणधर्म अनन्यसाधारण आहेत. चवीला कडू असणारे कारल्याचे अनेक प्रकार भारतात आढळतात. कारल्याच्या आहारातील वापरामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रीत राहते. वजन कमी होते, तसेच दृष्टी सुधारण्यास मदत होते. कारल्यामध्ये क, ए आणि बी जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पोटॅशियम, कॅल्शीयम आणी लोह यांचेही समृध्द भांडार आहे.

कारले खाल्यामुळे मधुमेहाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. चयापचय नियंत्रित करण्याव्यतिरिक्त, ते रक्तातील साखरेची अनपेक्षित वाढ नियंत्रीत करते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी, ती सर्वोत्तम भाजी आहे कारण तिचा हायपोग्लाइसेमिक प्रभाव आहे आणि त्यात विरघळणारे फायबर जास्त आहे. नियमित कारले खाल्ल्यामुळे कॅन्सर, केस आणि त्वचेच्या समस्या दूर होतात. कारल्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे उच्च प्रमाण असते, ज्यामुळे ते दूषित रक्ताशी संबंधित विविध परिस्थितींवर उपचार करू शकते. पालेदार हिरवी भाजी सेवनाने यकृतामधील अल्कोहोलचे अवशेष साफ होऊन आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. दमा, ब्राँकायटिस आणि नासिकाशोथ या समस्यावरही कारल्याचा उपचार होतो.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00