Home » Blog » Bhupesh Baghel : माजी मुख्यमंत्र्यांच्या १४ ठिकाणांवर ईडीचे छापे

Bhupesh Baghel : माजी मुख्यमंत्र्यांच्या १४ ठिकाणांवर ईडीचे छापे

मद्य,कोळसा घोटाळा प्रकरणात छापे

by प्रतिनिधी
0 comments
Bhupesh Baghel

रायपूर : प्रतिनिधी : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्या भिलाई येथील घर आणि १४ ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. ईडीने बघेल यांच्यावर मद्य, महादेव अप, आणि कोळसा घोटाळ्यासंबधी आरोप लावले आहेत. बघेल यांचे चिरंजीव चैतन्य बघेल यांच्या कार्यालयावरही छापे टाकण्यात आले आहेत. ईडीच्या कारवाईमागे राजकारण असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे तर आमच्याजवळ भक्कम पुरावे असल्याचा दावा ईडीने केला आहे. (Bhupesh Baghel)

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी ईडीचे पथक चार वाहनातून माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्या भिलाई येथील पद्मनगर घरात पोहोचले. ईडीने घरात मिळालेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. घराच्या बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ईडीच्या छाप्याचे वृत्त कळताच बघेल यांच्या घराच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली. त्यांनी या कारवाईला विरोध केला. ईडीने भिलाईतील नेहरुनगरमधील मनोज रजपूत, चरोंदामधील अभिषेक ठाकूर आणि संदीप सिंह, दुर्ग मध्ये कमल अग्रवाल यांच्या किशोर राईस मिल, सनील अग्रवाल यांच्या सहेली ज्वेलर्स आणि बिल्डर अजय चौहान यांच्या कार्यालयावर छापे टाकले आहेत. (Bhupesh Baghel)

छापे टाकण्यात आल्यावर माजी मुख्यमंत्री बघेल यांनी सोशल मिडिया ‘एक्स’ वर पोस्ट टाकली. सात वर्षे सुरू असलेला खोटा खटला न्यायालयाने निकालात काढला आहे. तरीही ईडीच्या मान्यवरांनी माजी मुख्यमंत्र्याच्या घरावर छापा टाकला आहे. या षढयंत्रामुळे पंजाबमध्ये काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न होत आहे. पण त्यांचा गैरसमज आहे. (Bhupesh Baghel)

ईडीने या घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे

भुपेश बघेल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दोन हजार कोटींचा मद्य घोटाळा झाला होता. या घोटाळ्यात आयएएस अधिकारी अनिल टुटेजा, आबकारी विभागाचे एमडी एपी त्रिपाठी, अनवर ढेबर सहभागी होते. महादेव सट्टा अपमध्ये सहा हजार कोटींची कमाई केल्याचा आरोप ईडीने केला आहे. या कमाईत छत्तीसगडचे उच्चपदस्थ नेते आणि अधिकारी यांचा सहभाग आहे. या अपचे दोन्ही प्रमोटर छत्तीसगड येथील आहेत. या प्रमोटर्सनी बघेल यांना ५०८ कोटी रुपये दिल्याचा आरोप ईडीने केला आहे. शुभम सोनीने असीम दास यांच्या माध्यमातून बघेल यांना रक्कम पोचवली आहे. बघेल यांनी ही एक राजनैतिक कारवाई असल्याचा आरोप केला आहे. (Bhupesh Baghel)

हेही वाचा :

 मुंबई पालिकेच्या ९० हजार कोटींच्या ठेवीवर मोदींचा डोळा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00