Home » Blog » भोपाळ दुर्घटनेतील घातक कचरा इंदोरमध्ये हटवण्यासाठी केला ग्रीन कॉरिडॉर

भोपाळ दुर्घटनेतील घातक कचरा इंदोरमध्ये हटवण्यासाठी केला ग्रीन कॉरिडॉर

इंदोरच्या नागरिकांचा विरोध

by प्रतिनिधी
0 comments
Bhopal Disaster

इंदोर : चाळीस वर्षांपूर्वी भोपाळमधील युनियन कार्बाईड कारखान्यातून विषारी वायू गळती झाली होती. या भयंकर दुर्घटनेत साडेपाच हजारांवर बळी गेले होते. अनेकांना अंधत्व आले. अनेकजण आयुष्यभर अपंग बनले. आजही अनेकजण या यातना भोगत आहेत. मात्र चाळीस वर्षे होऊन गेली तरी कारखान्यातील कचरा आणि साहित्य पडून होते. तो हलवण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. आता हा कचरा इंदोरमध्ये हलवण्यात आला आहे. या दुर्घटनेच्या दहशतीखाली वावरणाऱ्या येथील नागरिकांनी कचरा पेटवण्यास विरोध दर्शवला आहे. त्यासाठी इंदोरमधील पीथमपूर येथील स्थानिक नागरिक तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत. (Bhopal Disaster)

युनियन कार्बाईडमधून कडक पोलिस बंदोबस्तात १२ टन घातक कचरा हलवण्यात आला आहे. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. त्यासाठी रस्त्यांवर ३०० पोलिस बंदोस्तासाठी तैनात केले होते. या कचऱ्यातील काही भाग पेटवून त्याची चाचणी घेण्यात येईल. त्याआधारे आलेल्या निष्कर्षानंतर तो पेटवण्यात येणार आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजता हा कचरा पीथमपूर येथील कारखान्यात पोहोचला.

हायकोर्टाच्या आदेशनंतर चार दिवस हा कचरा हटवण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष बॅगांमध्ये ३३७ मेट्रिक टन कचरा कंटेनरमध्ये लोड करण्यात आला. हा कचरा पीथमपूर येथील एन्व्हायरो कंपनीत सुरक्षित पध्दतीने नष्ट करण्यात येणार आहे. हायकोर्टाने सहा जानेवारीपर्यंत कचरा हटवण्याचे आदेश दिले आहेत. (Bhopal Disaster)

कचऱ्या विल्हेवाटीला विरोध, बंदचे आवाहन

पीथमपूरला घातक कचरा आणल्यानंतर इंदोरमध्ये तीव्र विरोध होऊ लागला आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी कचरा जाळण्यास विरोध केला आहे. गुरुवारी महाराणा प्रताप स्टँडपासून रॅली काढण्यात आली. तर शुक्रवारी पीथमपूर बंदचे आवाहन केले आहे. सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत पर्यावरण आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

राजकीय नेत्यांचा विरोध

माजी मंत्री राजवर्धन सिंह, खासदार सावित्री ठाकूर, आमदार नीना वर्मा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली आहे. इंदोरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनीही कचरा जाळून टाकण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. (Bhopal Disaster)

तज्ज्ञांचे मत काय?

पर्यावरण तज्ज्ञ ओ. पी. जोशी यांच्या मतानुसार, हा कचरा जाळणे किती धोकादायक आणि विषारी आहे याचा अहवाल सरकारने सार्वजनिक केलेला नाही. कचरा जाळल्यावर किती नुकसान होणार आहे याची माहिती कधीच पुढे येणार नाही. या प्रक्रियेने पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. २००९ मध्ये या घटनेचा पहिला अहवाल आला होता. पण त्याला अनेक वर्षे झाली आहेत. हा कचरा अत्यंत विषारी आणि घातक आहे. कचरा जाळल्यानंतर त्यातून निघणारा धूरही अत्यंत घातक आहे.

काय झाले होते भोपाळमध्ये

तीन डिसेंबर १९८४ या दिवशी मध्यप्रदेशातील भोपाळ शहरात युनियन काबार्डइ लिमिटेड या कंपनीच्या कारखान्यात जमिनीखालील टँकमध्ये अत्यंत विषारी असा पेस्टिसाईल मिथाईल आयसोसायनाईट (एम.आय.सी) वायूच्या ४० टन गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १५ ते वीस हजार जणांचा मृत्यू झाला असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी सरकारी आकडा हा साडेपाच हजार आहे. या घटनेत अनेकांना अंधत्व आले तर हजारो व्यक्ती अपंग झाल्या. पन्नास हजारहून अधिक व्यक्तींना वायूगळतीचा फटका बसला.  (Bhopal Disaster)

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00