महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : रविवारी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) कार्यक्रम नांदेड प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आलेल्या एका ५३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. शांताबाई शिवाजी मोरे (रा.भनगी,ता.जि.नांदेड) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणावरून छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati ) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
छत्रपती संभाजीराजेंची टीका
काल नांदेड प्रशासनाच्या वतीने आयोजित लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात सकाळी दहा वाजल्यापासून महिलांना सक्तीने बोलण्यात आले. यात एका महिलेचा मृत्यू झाला. पण प्रशासनाकडून सांगितले की, अटॅक आला. यावर लाडक्या बहिणींना पैसे द्या मात्र, राजकीय स्टंट करू नका, असे म्हणत छत्रपती संभाजीराजेंनी राज्य सरकारवर कडाडले आहेत.
विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा लावण्याचा आमचा मानस
छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय की, विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा लढण्याचा आमचा माणस आहे आणि अनेक लोक आमच्याशी संपर्कात आहेत.थोड्या दिवसात वेगळे चित्र दिसेल. मनोज जरांगे पाटील यांना मी विनंती केलेली आहे की, पाडण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. विधानसभेच्या पटलावर आपला आवाज मांडू शकतील असे लोक आपण देऊयात, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
मराठा समाज आरक्षण
उद्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, मात्र सरकारने मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण टिकेल की नाही याबाबत समाज शाश्वत नाही, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. प्रामुख्याने मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालं नाही. मी सुद्धा ही लढाई २००७ पासून लढलो. दहा टक्के आरक्षण टिकेल की नाही माहित नाही, असे त्यांनी म्हटले आहे.