बेळगाव : प्रतिनिधी : दारुच्या आहारी गेलेल्या व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर खुरप्याने मृतदेहाचे तुकडे केले. ते बॅरेलमध्ये घातले आणि उसाच्या शेतात फेकून दिले. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी पोलिसांनी या गुन्हाचा छडा लावला. दुचाकी खरेदीसाठी शेत विकण्याचा तगादा लावत असल्याने खून केल्याची कबुली पत्नीने दिली आहे. (Belgaum Murder)
चिकोडी पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. १० डिसेंबर रोजी चिकोडी तालुक्यातील उमराणी गावच्या हद्दीत उसाच्या मळ्यात तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपास सुरू करुन संशयित सावित्री इटनाळला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता तिने खुनाची कबुली दिली. तिचा पती श्रीमंत दारुच्या आहारी गेला होता. दारु पिऊन शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. पत्नीच्या नावावर असलेला प्लॉट विकून दुचाकी घेण्याचा तगादा लावत होता, त्यामुळे तिने खून केल्याची कबुली दिली आहे.(Belgaum Murder)
सावित्रीचे माहेर इचलकरंजी आहे. १५ वर्षांपूर्वी श्रीमंतशी तिचा विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसांत तो दारुच्या आहारी गेला. तो कामधंदा करत नव्हता. सावित्री माहेरकडून मदत घेऊन काबाडकष्ट करुन घर चालवत होती. या दाम्पत्याला चार मुले आहेत. आठ डिसेंबर रोजी श्रीमंत रात्री घरी आल्यावर दारु पिऊन पत्नीला शिवीगाळ करु लागला. दुचाकीसाठी पैसे मागत होता. मुलांच्या अंगावरही धावून गेला. संताप अनावर झालेल्या सावित्रीने रात्री झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर मृतदेहाचे खुरप्याने तुकडे केले. ते पाण्याच्या बॅरेलमध्ये घालून उसाच्या शेतात फेकून दिले.(Belgaum Murder)
खुनासाठी वापरलेले हत्यार आणि साहित्य विहिरीत फेकून दिल्याची कबुली सावित्रीने दिली. चिकोडी पोलिसांनी सावित्रीला अटक करुन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
- हेही वाचा :
त्याला रक्ताचे शिंपण घालायचे होते…
देशमुख हत्येच्या खटल्यात उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची तयारी