बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा रविवारी येथे आयोजित केला होता. मात्र पोलिसांनी दडपशाहीच्या मार्गाने होऊ दिला नाही. पोलिसांनी मेळावा होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांवर जमावबंदी आदेश लागू केला होता. तरीही मेळाव्यासाठी मराठी भाषिक आणि समितीचे कार्यकर्ते येत होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘बेळगाव-निपाणी-बिदर-भालकी-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ ‘महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय आम्ही राहणार नाही,’ असा इशारा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. (Belgaon News)
१) पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करून अन्यत्र नेताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
२) एकेकट्या आलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले.
३) समितीने मेळाव्याची घोषणा केल्यानंतर रविवारी सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यांच्याकडे असलेल्या ड्रोनच्या माध्यमातून सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते.
४) ठिकठिकाणांहून आलेल्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यांना एका वाहनातून अन्यत्र हलवले.
५) धर्मवीर संभाजी महाराज चौकात कार्यकर्ते मोठ्या संख्येने येतील, अशी शक्यता गृहीत धरून येथे मोठा बंदोबस्त तैनात केला होता.