पुणे : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला पुण्यातून शनिवारी सकाळी अटक करण्यात आली. यातील आणखी एक आरोपी फरार आहे. कृष्णा आंधळे असे त्याचे नाव आहे. इतके दिवस फरार असलेल्या या मुख्य आरोपींचा शोध पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका डॉक्टरने दिलेल्या माहितीच्या आधारे लावण्यात पोलिसांना यश आले. या दोघांना १४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावणी आली आहे. (Beed sirpanch)
घुले, सांगळे आणि आंधळे या तिघांना पळून जाण्यास केल्याप्रकरणी डॉ. संभाजी वायबसेला पोलिसांनी याआधीच अटक केली आहे. त्याच्या पत्नीसह आणखी तिघांची कसून चौकशी करण्यात आली. डॉ. वायबसेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता आहे. वायबसेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक पथक तयार केले. आरोपींचे मोबाईलचे लोकेशन शोधले. ते ज्या लोकांच्या संपर्कात होते त्यांच्या चौकशीनंतरही काही माहिती मिळवली. त्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली आहे.(Beed sirpanch)
मंत्री धनंजय मुंडेचा सहकारी वाल्मिक कराडवर पवनचक्की प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून दोन कोटी रुपये खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. सीआयडी पोलिसांना शरण आल्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत आहे.
खंडणी प्रकरणातील आणखी एक संशयित विष्णू चाटेने कराड आणि अवदा एनर्जीचे प्रकल्प व्यवस्थापक यांच्यातील संभाषणाचा तपशील उघड केल्याचे पोलिसांनी सांगितले. याच्या आधारे वायबसेकडे चौकशी करण्यात आली.(Beed sirpanch)
‘चौकशीदरम्यान, आम्ही आरोपींच्या ठावठिकाणाविषयी डॉ. संभाजी वायबसेकडून गंभीर माहिती मिळवली. त्यावरून तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने दोन संशयितांना शोधून अटक करण्यात आली, असे तपासअधिकाऱ्यांनी सांगितले.
वायबसे कोण?
संभाजी वायबसे हा स्वतः बीडमध्ये एक रुग्णालय चालवत असे. मात्र नंतर ऊसतोड मुकादम म्हणून काम करू लागला. त्याने असा निर्णय का घेतला, याविषयी अधिक माहिती नाही. तो घुलेसह, सुधीर सांगळेसोबत तो काम करत असे. त्यातूनच त्याने या सर्वांना मदत केल्याचा संशय आहे. त्याची पत्नी वकील आहे. देशमुखांची हत्या झाल्यानंतर हे दाम्पत्य परागंदा झाले होते.