ढाका : बांगला देशचे संस्थापक नेते शेख मुजीबुर रहमान यांचे ढाका येथील निवासस्थान निदर्शकांनी जाळून टाकले. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सोशल मीडियाद्वारे केलेल्या भाषणात त्यांच्या पक्षाच्या समर्थकांना मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर निदर्शकांनी हे कृत्य केले.(bangla desh protest )
बांगलादेशचे आघाडीचे दैनिक, डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, निदर्शकांनी काल रात्री बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचे धनमोंडी-३२ येथील निवासस्थान जाळले. त्याचे काही भाग उद्ध्वस्त केले. त्यानंतर काहींनी “फॅसिझमचे तीर्थक्षेत्र” असा उल्लेख सोशल मीडियावर केला.
“बुलडोझर मिरवणूक” नावाचा एक कार्यक्रम रात्री ९ वाजता आयोजित करण्यात आला होता. शेख हसीना याचदरम्यान आभासी माध्यमातून भाषण करणार होत्या. सध्या बंदी असलेल्या अवामी लीगची विद्यार्थी संघटना छात्र लीगने या आभासी कार्यक्रमाची घोषणा केली होती.(bangla desh protest )
त्याआधी , शेकडो निदर्शकांनी रात्री ८ वाजताच्या सुमारास, म्हणजे नियोजित मिरवणुकीच्या एक तास आधी या इमारतीवर हल्ला केला. अनेक निदर्शक हातात फावडे आणि हातोडा घेऊन आले होते. या इमारतीवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर ती पाडण्यास सुरुवात केली. मुजीबुर यांच्या भिंतीचित्राचीही तोडफोड करण्यात आली, असे डेली स्टारने प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने म्हटले आहे.
रात्री ९:३० च्या सुमारास इमारतीला आग लावण्यात आली. पहाटे दोनपर्यंत इमारतीचे काही भाग जमीनदोस्त झाले होते, असे वृत्त आहे.
दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना हसीना म्हणाल्या, “ते इमारत पाडू शकतात, पण इतिहास बदलू शकत नाहीत. इतिहास त्यांना माफ करणार नाही.”(bangla desh protest )
शेख हसीना यांनी बांगलादेशातील नागरिकांना अंतरिम सरकारविरुद्ध उभे राहण्याचे आवाहन केले आहे. या सरकारने असंवैधानिक मार्गाने सत्ता हस्तगत केल्याचा आरोपही केला.
हेही वाचा :