करीमनगर : प्रतिनिधी : तेलंगणामध्ये विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी गुरुवारी (दि. २७ फेब्रुवारी) रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी करीमनगर येथे आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहराज्य मंत्री बंदी संजय कुमार यांनी, प्रचारसभेत काँग्रेसला मत दिल्यास पाकिस्तान विजयी होईल, असे वक्तव्य केले. त्यामुळे निवडणूक वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने मंत्री बंदी संजय कुमार यांच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.(Bandi Sanjay Kumar)
बंदी संजय कुमार यांनी निझामाबाद, मेडक, करीमनगर आणि आदिलाबाद येथे प्रचारसभा घेतली. यावेळी मतदारांना संबोधित करताना त्यांनी काँग्रेसची तुलना पाकिस्तानशी केली. काँग्रेसला मतदान केले तर पाकिस्तान विजयी होईल, असे ते म्हणाले. (Bandi Sanjay Kumar)
प्रचारसभेत मंत्री बंदी संजय कुमार म्हणाले, “हा हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना आहे. भाजप टीम इंडिया आहे, तर काँग्रेस पाकिस्तानची टीम आहे. ज्या प्रकारे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत करून चाहत्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण केल्या, त्याच प्रमाणे भाजपही लोकांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करेल. (Bandi Sanjay Kumar)
भाजपला मतदान केले तर टीम इंडियाचा विजय होईल. काँग्रेसला मतदान केल्यास पाकिस्तानचा विजय होईल.” बंदी संजय कुमार यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा काँग्रेस आमदार बी. महेश गौड यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करून चांगलाच समाचार घेतला आहे. काँग्रेस खासदार चामला किरण कुमार यांनी बंदी संजय कुमार यांच्या विधानाचा समाचार घेत त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. बंदी संजय कुमार यांच्यावर तत्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी चामला किरण कुमार यांनी केली आहे.
हेही वाचा :
पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घातल्या
कोल्हापूरसह ६० ठिकाणी सीबीआय छापे