कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नागपूरचा प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. तट यांनी फेटाळला. त्यामुळे कोरटकला जामिनासाठी जिल्हा न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. त्यामुळे कोरटकरचा कळंबा मध्यवर्ती कार्यालयातील मुक्काम वाढला आहे. (Bail denied)
रविवारी सुट्टीदिवशी कामकाज पाहणाऱ्या न्यायालयाने कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला होता. सोमवारी ईदची सुट्टी असल्याने आज मंगळवारी एक एप्रिल रोजी न्यायालयाचे कामकाज सुरू झाले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. तट यांच्यासमोर जामिनासाठी सुनावणी झाली. कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी जामीन अर्ज मंजूर करावा अशी न्यायालयाला विनंती केली. त्याला सरकारी वकील संभाजी पवार यांनी विरोध केला. (Bail denied)
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना संपूर्ण देश मानतो. पण त्याच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य कोरटकरने केले आहे. त्याला जामिन दिला तर समाजात चुकीचा संदेश जाईल, याकडे सरकारी वकील पवार यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्याने पोलिस आणि न्यायालयाला खोटी माहिती दिली. इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन केल्यानंतर पहिल्यांदा हा आवाज माझा नव्हता असा दावा केला होता. एआय तंत्रज्ञान वापरुन दुसऱ्याने फोन केला असे त्याने पोलिस आणि न्यायालयाला सांगितले. त्याला जामिन दिला तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करेल. इंद्रजीत सावंत यांचे वकील असिम सरोदे यांनीही कोरटकरला जामिन देऊ नये असा युक्तिवाद केला. (Bail denied)
बचाव पक्षाचे वकील सौरभ घाग यांनी कोरटकरने पोलिस कोठडीत सहकार्य केले आहे. त्याला ताब्यात घेऊन बराच कालावधी लोटला असल्याने जामिन द्यावा अशी विनंती केली. तसेच इंद्रजीत सावंत यांना एआय तंत्रज्ञान वापरुन फोन केला ही आमच्या अर्जात प्रिटिंग मिस्टेक होती. अर्जातील ही माहिती आम्ही मागे घेत असल्याचे वकील घाग यांनी सांगितले. सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांचा जामिन फेटाळला. (Bail denied)
न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळल्याने कोरटकरला जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे. उद्या बुधवारी (दि.२) त्याचे वकील जामिनासाठी अर्ज करणार आहेत. (Bail denied)
हेही वाचा :
सर्वोच्च न्यायालयाने प्रयागराज प्राधिकरणाचे उपटले कान