कोल्हापूर : प्रतिनिधी : हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचारास दाखल असलेल्या युवतीचा विनयभंग करणाऱ्या पोलिसाला अटक करण्यात आली. चेतन दिलीप घाटगे असे पोलिसाचे नाव आहे. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. गेले आठवडाभर तो फरार होता. (Bad touch)
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात एक गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यातील फिर्याद देणारी युवती नागाळा पार्क येथील एका हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत होती. या गुन्हाचा तपास करण्यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्यातील कर्मचारी दिलीप घाटगे दोन एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी संबधित महिलेचा जबाब घेतला. आयसीयूमध्ये ते एक तास होते. जबाब घेताना चेतन घाटगे यांनी महिलेचा विनयभंग केला. तू माझी मैत्रिण आहे असे म्हणून संबधित महिलेच्या पाठीवर हात फिरवत तू भिऊ नकोस, काही अडचण असल्यास मला फोन कर असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. संबधित महिलेने चेतन घाटगेने बॅड टच केल्याने पोलिसांकडे कायदेशीर तक्रार केली. (Bad touch)
शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होत असतानाच चेतन घाटगे यांना कुणकुण लागल्याने ते गायब झाले. पोलिस त्यांचा शोध घेत होते. त्यांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल त्यांना पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. आज मंगळवारी त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिस निरीक्षक संतोष डोके गुन्ह्याचा तपास करत आहेत. (Bad touch)
हेही वाचा :
कामरा यांच्या याचिकेवर मुंबई पोलिसांना नोटीस
तामिळनाडूच्या राज्यपालांची कृती ‘बेकायदा’ आणि चुकीची