Home » Blog » Ayodhya accident : कुंभमेळ्यासाठी गेलेले नांदेडमधील चौघे भाविक ठार

Ayodhya accident : कुंभमेळ्यासाठी गेलेले नांदेडमधील चौघे भाविक ठार

प्रयागराजहून अयोध्याकडे जाताना अपघात, १६ जखमी

by प्रतिनिधी
0 comments
Ayodhya accident

बाराबंकी :  उत्तरप्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील कटरा ठाण्याजवळ झालेल्या अपघातात नांदेडचे चौघे ठार झाले तर १८ जखमी झाले. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या बसला टेंपो ट्रॅव्हलरची जोरदार धडक मारली. कुंभमेळ्याहून पहाटे स्नान करुन नांदेडमधील भाविक टेंपो ट्रॅव्हलरने अयोध्याकडे जात असताना अपघात झाला. सुनील दिंगबर वरपडे वय ५०, अनुसया दिगंबर वरपडे, दीपक गणेश गोडले स्वामी वय ४०, जयश्री कुंडलिकराव चव्हाण वय ५० रा. अडगाव रंजेबुवा, ता. वसमत जि. हिंगोली अशी मृतांची नावे आहेत. (Ayodhya accident)

बाराबंकी जिल्हाधिकारी कार्यलयाने सांगितलेल्या वृत्तानुसार अपघात १६ प्रवाशी जखमी झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने नांदेड पोलिस आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नांदेडला पाठवण्याची प्रक्रियेस सुरुवात झाली असून सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मृतदेह नांदेडला पोहोचतील. (Ayodhya accident)

कुंभ मेळ्यात स्नान केल्यानंतर एकत्र असलेल्या नांदेडच्या भाविकांनी टेप्मो टॅव्हलर बुक केली होती. पहाटे साडेपाच वाजता स्नान केल्यानंतर ते अयोध्याकडे निघाले होते. टेंपो ट्रॅव्हलरमध्ये २३ प्रवासी होते. बसचा प्रवास सुरु असताना बाराबंकी जिल्ह्यातील कटरा ठाण्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या बसला टेंपो ट्रॅव्हलरची जोरदार धडक बसली. धडकी इतकी मोठी होती बसचे मोठे नुकसान झाले. अपघाताचे वृत्त कळताच कटरा ठाण्याचे पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. (Road accident)
जखमींची नावे अशी,  चैतन्य राहुल स्वामी वय १६,  शिवशक्ती गणेश गोडले ५५, भक्ति दीपक गोडले ३०, रंजना रमेश मथापती ५५,  गणेश गोडले ५५, अनीता सुनील वरपडे ४०, वीर सुनील वरपडे ९, सुनीता माधवराव कदम ६०, छाया शंकर कदम ६०, ज्योति प्रदीप गैबडी ५०, आर्य दीपक गोडले ५, लोकेश गोडले ३५, श्रीदेवी बरगले ६०.  (Ayodhya accident)

हेही वाचा 

दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी; १८ प्रवासी ठार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00