Home » Blog » Auto Tariff  : डोनाल्ड ट्रम्पकडून ऑटो टॅरिफ बॉम्ब

Auto Tariff  : डोनाल्ड ट्रम्पकडून ऑटो टॅरिफ बॉम्ब

वाहने, ऑटो पार्टस्वर २५ टक्के कर

by प्रतिनिधी
0 comments
Auto Tariff

वॉशिंग्टन : अमेरिकेतील देशांतर्गत ऑटो उद्योगाला बळकटी येण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ टक्के ऑटो टॅरिफची घोषणा केली आहे. अमेरिकेत आयात होणारी वाहने आणि ऑटो पार्टस् वर २५ टक्के कर लावला आहे. त्याचा फटका कार उद्योगनिर्मिती करणाऱ्या युरोपियन देश, जपान या देशांना बसणार आहे. भारतातून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या ऑटो पार्टस् उद्योगावर परिणाम होणार असला तरी भारताची अमेरिकेत निर्यात कमी आहे. तरीही संभाव्य घट रोखण्यासाठी भारताला अन्य पर्याय शोधावे लागणार आहेत. (Auto Tariff )

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन एप्रिलपासून आयात केलेल्या कार आणि महत्त्वाच्या ऑटो पार्टसवर २५ टक्के कर लागू करण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी  बुधवारी (२७ मार्च) सर्व आयात केलेल्या कार, ट्रक आणि प्रमुख ऑटो पार्ट्सवर २५% कर लादण्याच्या एका व्यापक घोषणेवर स्वाक्षरी केली. अमेरिकेतील वाहन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी या अमेरिकन ऑटोमोटिव्ह उत्पादन उद्योगाला पुनरुज्जीवित करण्यासाठी हे धोरण तयार केले आहे. (Auto Tariff )

ऑटो करामध्ये फक्त पूर्णपणे असेंबल केलेली वाहनेच नाहीत तर इंजिन, ट्रान्समिशन, पॉवरट्रेन सिस्टीम आणि इलेक्ट्रिकल असेंब्ली यासारख्या महत्त्वाच्या घटकांचाही समावेश आहे. व्हाईट हाऊसच्या मते, या उपायामुळे दरवर्षी सुमारे १०० अब्ज डॉलर्स मिळण्याची अपेक्षा आहे.  जे अमेरिकेच्या व्यापार धोरणातील एक महत्त्वपूर्ण वळण असण्याची शक्यता आहे. (Auto Tariff )

अमेरिकेत जपान, मेक्सिको, कॅनडा या देशातून ऑटो सेक्टरची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्यामानाने भारताची निर्यात कमी होते. तरीही ऑटो टॅरिफचे परिणाम भारताच्या ऑटो उदयोगावरही पडण्याची शक्यता आहे. जागतिक साखळीत खोलवर रुजलेला भारताचा ऑटो कंपोनंट उद्योग अमेरिकन कार उत्पादकांना एक प्रमुख पुरवठादार म्हणून उदयास आला आहे. (Auto Tariff )

भारताने २०२३ मध्ये अमेरिकेला १.५ अब्ज डॉलर्सचे ऑटो पार्टस् निर्यात केले आहेत. नवीन टॅरिफचा फटका भारताला बसू शकतो. ज्यामुळे यूएस आधारित ऑटोमेकर्ससाठी इनपुट खर्च वाढू शकतो. आणि भारतीय पार्टस् ची मागणी कमी होऊ शकते. पुरवठदारांचा नफाही कमी होण्याची शक्यता आहे. आणि त्यांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागतो. (Auto Tariff )

अमेरिकेत जॅग्वार लँड रोव्हर वाहनांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्याचा परिणार टाटा मोटर्सवर झाला. गुरुवारी टाटा मोटर्स चे शेअर्स पाच टक्क्यांनी घसरले. भारतातील ऑटो कंपन्याचे अन्य देशातील कंपन्यांशी करार झाले आहेत. या करारानुसार वाहनांमध्ये भारतात तयार झालेले ऑटो पार्टस् वापरले जातात. त्याचा फटका भारताला बसणार आहे. (Auto Tariff )

हेही वाचा :

उच्च न्यायालयातील ७७ टक्के न्यायाधीश उच्च जातीचे

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00