Home » Blog » Australia : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबरमध्ये

Australia : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबरमध्ये

क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे पुढील मोसमाचा कार्यक्रम जाहीर

by प्रतिनिधी
0 comments
Australia

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने २०२५-२६ च्या मोसमातील मायदेशामध्ये होणाऱ्या स्पर्धांचा कार्यक्रम
रविवारी जाहीर केला. भारताचे पुरुष व महिला हे दोन्ही संघ या मोसमामध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार
आहेत. भारतीय पुरुष संघ या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये तीन वन-डे व पाच टी-
२० सामने खेळेल. (Australia)
ऑगस्ट महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणाऱ्या टी-२० मालिकेने ऑस्ट्रेलियाच्या मायदेशातील नव्या
मोसमाची सुरुवात होईल. त्यानंतर, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांची वन-डे
मालिकाही रंगणार आहे. भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेतील सामने पर्थ, ॲडलेड व सिडनी येथे
खेळवण्यात येणार आहेत. टी-२० मालिकेसाठी कॅनबेरा, मेलबर्न, होबार्ट, गोल्ड कोस्ट आणि ब्रिस्बेन ही
ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. ॲशेस या ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या क्रिकेटविश्वातील
सर्वांत जुन्या व बहुचर्चित कसोटी मालिकेचे यजमानपदही या मोसमात ऑस्ट्रेलिया भूषवणार आहे.
नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान पाच कसोटींची ॲशेस मालिका खेळवण्यात येणार आहे. पर्थ, ब्रिस्बेन,
ॲडलेड, मेलबर्न आणि सिडनी या ठिकाणी ॲशेस कसोटी सामने रंगतील. यांपैकी, ब्रिस्बेन येथील कसोटी
दिवस-रात्र खेळवण्यात येईल. (Australia)
भारतीय महिला क्रिकेट संघ पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या
दौऱ्यामध्ये भारताचा संघ तीन वन-डे, तीन टी-२० आणि एक कसोटी सामना खेळणार आहे. पर्थ येथे ६ ते
९ मार्चदरम्यान भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये कसोटी सामना रंगेल. (Australia)

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
वन-डे मालिका
पहिला सामना – १९ ऑक्टोबर – पर्थ स्टेडियम, पर्थ
दुसरा सामना – २३ ऑक्टोबर – ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
तिसरा सामना – २५ ऑक्टोबर – एससीजी, सिडनी

…..
टी-२० मालिका
पहिला सामना – २९ ऑक्टोबर – मॅनुका ओव्हल, कॅनबेरा
दुसरा सामना – ३१ ऑक्टोबर – एमसीजी, मेलबर्न
तिसरा सामना – २ नोव्हेंबर – बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
चौथा सामना – ६ नोव्हेंबर – गोल्ड कोस्ट स्टेडियम, गोल्ड कोस्ट
पाचवा सामना – ८ नोव्हेंबर – गॅबा स्टेडियम, ब्रिस्बेन

हेही वाचा :

आर्यना सबालेंकाला विजेतेपद

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00