भोपाळ : जयश्री गायत्री फूड प्रोडक्टसच्या डायरेक्टर पायल मोदी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर भोपाळमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी त्यांनी चार पानी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नावाचा उल्लेख आहे. पायल मोदी यांच्या कंपनीवर दोनच दिवसांपूर्वी ईडीचा छापा पडला आहे.(Attempt to suicide)
जयश्री गायत्री फूट प्रॉडक्टस् प्रायव्हेट लिमिटेड प्रकरणी ईडीने मध्य प्रदेशातील भोपाळ, सिहोर, मुरैना जिल्ह्यातील विविध ठिकाणी २९ ठिकाणी छापे टाकले. छाप्यामध्ये काही कागदपत्रे मिळून आली. तसेच रोख २५ लाख रुपये, बीएमडब्लू आणि फॉर्च्युनर अशा अलिशान कार सापडल्या. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पायल मोदी यांचे पती किशन मोदी यांच्या अनेक कंपन्या आणि कुटुंबातील सदस्यांकडे ६६ कोटी रुपयांची संपत्तीची कागदपत्रे मिळाली आहेत. ही कागदपत्रे ईडीने जप्त केली आहे. तसेच ६.२६ कोटी रुपयांची संपत्तीही जप्त केली आहे.
विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
ईडी छाप्यानंतर पायल मोदी यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्चा सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल असे कधी मनात आणले नव्हते. ज्यांच्या हातात राजकीय शक्ती आहे त्यांच्यामुळे एका सुखीसमाधानी कुटुंबावर ही वेळ आली आहे. या घटनेला चंद्रप्रकाश पांडे, युवा लोजपाचे प्रवक्ता वेद प्रकाश पांडे, सुनील त्रिपाठी, भगवान सिंह मेवडा, हितेश पंजाबी आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे जबाबदार आहेत. चंद्रप्रकाश पांडे हे चिराग पासवान यांचे मेहुणे आहेत. वेद प्रकाश त्यांचा लहान भाऊ आहे. ही सर्व मंडळी चिराग पासवान यांच्या राजकीय ताकदीचा वापर करून त्रास देत आहेत. या लोकांनी आमच्या कंपनीत चोरी केली आहे. त्यांच्याविरोधात आम्ही पोलिस ठाण्यात फिर्यादही दिली आहे, पण आमचे कोणी ऐकून घेत नाहीत. आमचे घर, कारखान्यावर सीजीएसटी, ईओडब्ल्यू, ईडीआणि एसएसएसआईकडून छापे टाकण्यात आले आहेत. (Attempt to suicide)
पतीला ठार मारण्याची धमकी
पायल मोदी यांना तीन लहान मुले आहेत. या लोकांनी मला आणि माझ्या पतीला त्रास दिला आहे. माझे पती हृदयविकाराने त्रस्त आहेत. त्यांना ठार मारण्याची धमकीही दिली आहे. आम्ही सर्व ठिकाणी तक्रार दिली आहे, पण आमचे कोणीही ऐकत नाहीत. मुख्यमंत्री मोहन यादव, पीएमओ आणि भोपाळ पोलीस कमिशनर यांच्याकडे आम्हाला न्याय मिळावा म्हणून मागणी केली आहे, पण आम्हाला त्रास देणाऱ्यांवर कोणतीच कारवाई होत नाही, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. (Attempt to suicide)
या सदंर्भात लोकजनशक्ती पार्टीकडून खुलासा करण्यात आला आहे. पक्षाचे प्रवक्ते प्रो. विनीत सिंह यांनी असे म्हटले आहे की ‘आत्महत्या हे चुकीचे पाऊल आहे. मंत्री आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात त्यांनी पोलिसांत तक्रार करावी. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आमची पार्टी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील.’
हेही वाचा :
ॲट्रॉसिटीं’तर्गत बौद्धिक संपत्तीचाही समावेश
2025 प्रूफ ऑफ पुडिंग इज इटिंग !
कुराण जाळणाऱ्याची हत्या