Home » Blog » Attempt to attack: कोर्ट आवारात कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न

Attempt to attack: कोर्ट आवारात कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न

पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

by प्रतिनिधी
0 comments
Attemp to attack

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा प्रकाश कोरटकर याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली. न्यायालयातून बाहेर पडताना दोघा शिवप्रेमींनी त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. (Attempt to attack)

यावेळी शिवप्रेमींनी कोरटकरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांसह कोल्हापुरी चप्पल फेकण्याच्या तयार असलेल्या एका कार्यकर्त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी दुपारी कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा राज्यात प्रशांत कोरटकर याला अटक केली. त्याला घेऊन कोल्हापूर पोलिस मंगळवारी (२५ मार्च) सकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात घेऊन आले. कोरटकरला पोलीस ठाण्यात आणल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर शिवप्रेमी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या संख्येने जमले.(Attempt to attack)

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवप्रेमींनी कोरटकरला कोल्हापुरी हिसका दाखवण्याचा इशारा दिला होता. शिवप्रेमीच्या संतप्त भावना लक्षात घेऊन पोलिसांनी कोरटकरला न्यायालयात हजर करण्यासाठी गनिमी कावा करून जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या मागील दरवाजातून त्याला न्यायालयातकडे घेऊन गेले. ही घटना कळतात शिवप्रेमी संतप्त झाले. (Attempt to attack)

पोलिसांनी कोरटकरला न्यायालयाच्या मागच्या दरवाजाने कोर्टात नेले. यावेळी कोर्टाच्या आवारात शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. काही शिवप्रेमी कोल्हापुरी चप्पल घेऊन आले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने कोरटकरला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली. त्यानंतर पोलिस कोरटकरला घेऊन न्यायालयाच्या बाहेर आले. यावेळी दबा धरून बसलेल्या जयदीप शेळके आणि उदय लाड यांनी कोरकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कोरटकरभोवती कडे केलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उदय लाड आणि जयदीप शेळकेला झडप मारुन बाजूला केले. त्यानंतर पोलिस कोरटकरला घेऊन गेले. यावेळी कोरटकरच्या विरोधात शिवप्रेमींनी जोरदार घोषणा दिल्या.

हेही वाचा :

कोरटकरला तीन दिवसाची पोलिस कोठडी

कोरटकरला न्यायालयात नेताना पोलिसांकडून ‘गनिमी कावा’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00