Home » Blog » Arshdeep : अर्शदीपला आयसीसीचे नामांकन

Arshdeep : अर्शदीपला आयसीसीचे नामांकन

महिलांमध्ये स्मृती मानधनाही पुरस्काराच्या शर्यतीत

by प्रतिनिधी
0 comments
Arshdeep

दुबई : भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट टी-२० क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. महिला संघाची सलामी फलंदाज स्मृती मानधनाला सर्वोत्कृष्ट महिला वन-डे क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन आहे. (Arshdeep)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) रविवारी विविध पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर केली. भारताने या वर्षी जिंकलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये अर्शदीपची महत्त्वाची भूमिका होती. त्याने यावर्षी १८ टी-२० सामन्यांत १३.५ च्या सरासरीने ३६ विकेट घेतल्या. एका वर्षांत सर्वाधिक टी-२० विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तो भुवनेश्वर कुमारपाठोपाठ दुसऱ्या स्थानी आहे. भुवनेश्वरने २०२२ मध्ये ३७ विकेट घेतल्या होत्या. सर्वोत्कृष्ट टी-२० क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी अर्शदीपसोबत पाकिस्तानचा बाबर आझम, ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा शर्यतीत आहेत. (Arshdeep)

भारताच्या महिला संघाची उपकर्णधार असणाऱ्या स्मृतीने यावर्षी १३ वन-डे सामन्यांत ४ शतकांसह ७४७ धावा केल्या आहेत. या वर्षी सर्वाधिक वन-डे धावा करणाऱ्या महिला फलंदाजांमध्ये ती अग्रस्थानी आहे. तिच्यासह सर्वोत्कृष्ट महिला वन-डे क्रिकेटपटूच्या विभागात श्रीलंकेची चमारी अटापट्टू, ऑस्ट्रेलियाची ॲनाबेल सथरलँड आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वॉल्वार्ट यांनाही नामांकने आहेत. स्मृतीने आतापर्यंत तीन आयसीसी पुरस्कार पटकावले असून २०१८ मध्ये तिला सर्वोत्कृष्ट महिला वन-डे क्रिकेटपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. (Arshdeep)

भारताच्या महिला संघातील फिरकीपटू श्रेयांका पाटीलला सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. श्रेयांकाने यावर्षी १३ टी-२० सामन्यांत १५, तर २ वन-डे सामन्यांत ४ विकेट घेतल्या आहेत. (Arshdeep)

हेही वाचा :

कांगारूंच्या शेपटाने दमवले
दक्षिण आफ्रिका ‘वर्ल्ड चॅम्पियनशीप’च्या अंतिम फेरीत

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00