Home » Blog » Anurag Kashyap: बॉलिवूडचे वातावरण विषारी

Anurag Kashyap: बॉलिवूडचे वातावरण विषारी

by प्रतिनिधी
0 comments
Anurag Kashyap

मुंबई : बॉलिवूडच्या लोकांपासून आता मला दूर राहायचे आहे. त्यातील वातावरण खूपच विषारी झाले आहे. इथली सर्जनशीलता संपली आहे…’ प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी अशी उद्विगनता व्यक्त करत बॉलिवूडला रामराम करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र ते आता कोणत्या शहरात जाणार आहेत, हे मात्र त्यांनी जाहीर केले नाही.(Anurag Kashyap)

या चित्रपटसृष्टीतील प्रत्येकजण अवास्तव गोष्टींच्या मागे लागला आहे. विशेषत: सर्जनशीलतेपेक्षा ₹ ५०० आणि ₹ ८०० कोटींचे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

गँग्ज ऑफ वासेपूरसारखे चित्रपट देणाऱ्या कश्यप आपल्या शब्दावर आता ठाम राहिले आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांनी दक्षिण भारतात स्थलांतर करण्याचा आपला निर्धार व्यक्त केला होता. त्यांचा हा निर्णय त्यांनी आता प्रत्यक्षात आणला आहे. ‘मी मुंबई सोडली आहे,’ असे हसत हसत सांगताना त्यांनी अलीकडेच त्यांच्या नवीन घराचे पहिले भाडे दिले आहे. मात्र कोणत्या राज्यात किंवा शहरात गेला आहे हे तो उघड करणार नाही, परंतु त्यांनी बेंगळुरू शहर निवडले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.(Anurag Kashyap)

बॉलिवूडच्या लोकांत आव्हानात्मक आणि रोमांचक कामाचा अभाव आहे. चांगली कामे करण्यापेक्षा विलासी जीवनशैलीमागे येथे प्रत्येकजण धावत आहे. दूरदृष्टीचा तर खूपच अभाव आहे. निर्मात्यांकडे जोखीम टाळण्याचाच कल असतो. त्यामुळे या उद्योगाबद्दलल खूपच भ्रमनिरास झाल्याचे ते सांगतात.

२०२४ मध्ये रिलीज झालेला आणि मंजू वॉरियर अभिनीत मल्याळम चित्रपट ‘फुटेज’ हिंदीत डब करण्यात आला आहे. तो ७ मार्चला रिलीज होत आहे. या पार्श्वभूमीवर कश्यपचा दक्षिणेकडचा प्रवास सुरू होत आहे. हा एक विशेष योगायोग मानण्यात येत आहे. हा चित्रपट, साथीच्या काळात सेट केलेला एक प्रायोगिक फाउंड-फूटेज थ्रिलर आहे. कुंबलंगी नाईट्स, महेशिन्ते प्रतिकारम अशा प्रसिद्ध सिनेमाचे दिग्दर्शक सैजू श्रीधरन यांनी हा दिग्दर्शित केला आहे. तो सात महिन्यांपूर्वी मल्याळममधून हा सिनेमा रिलीज झाला आहे. (Anurag Kashyap)

मल्याळम् सिनेमासृष्टीतील शोषणासंबंधी हेमा समितीचा अहवाल ‘फुटेज’च्या रिलीजच्या सुमारास आला होता. २०२४ मध्ये वायनाडमध्येही मोठी दुर्घटना घडली होती. त्यामुळे या सिनेमाच्या हिंदी रिलीजसाठी आम्ही योग्य वेळेची वाट पाहत होते. काही काळ थांबण्याचा निर्णय आम्ही घेतला,’ असे कश्यप स्पष्ट करतात.

त्यांना चित्रपटाचे योग्य डबिंग व्हावे अशीही इच्छा होती. त्यांचे गँग्स ऑफ वासेपूर (२०१२) इटालियन, फ्रेंच आणि स्पॅनिशमध्ये डबिंग करण्यात आले आहे. दक्षिणेकडील चित्रपटांचे हिंदी डबिंग अनेकदा भयानक असते, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. ‘मी ‘महाराजा’ पाहू शकत नाही. कारण तो खूप वाईटरित्या डब केला आहे’, असे सांगतात.

हेही वाचा :

अमेरिकेपुढे चीन कदापि झुकणार नाही

भय्याजी जोशींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00