मुंबई : विशेष प्रतिनिधी : विधानसभा उपाध्यक्षपद निवडणुकीसाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. बुधवारी (२६ मार्च) औपचारिकपणे त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली जाईल.(Anna Bansode)
अत्यंत अल्पमतात असलेल्या विरोधी महाविकास आघाडीने उमेदवार देण्याचे टाळले आहे. विधान परिषदेतील रिक्त झालेल्या ५ जागांसाठीही त्यांनी उमेदवारी दिलेली नव्हती. त्यामुळे सत्ताधारी भाजपाचे ३ तर शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.(Anna Bansode)
उपाध्यक्षपदासाठी बुधवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. महायुतीच्या फार्मुल्यानुसार हे पद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या वाट्याला देण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून या पदासाठी अण्णा बनसोडे व राजकुमार बडोले यांच्या नावाची चर्चा होती.त्यामध्ये पिंपरीचे विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत असलेल्या अण्णा बनसोडे यांनी बाजी मारली.(Anna Bansode)
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्यावतीने त्यांनी मंगळवारी (२५ मार्च) दुपारी आपला अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
कोरटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी
कोर्ट आवारात कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न