मुंबई : विशेष प्रतिनिधी : गेल्या दोन महिपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. मागील सरकारमध्ये कृषिमंत्री असताना त्यांनी विविध योजनातून तब्बल १६१ कोटी ६८ लाखाचा घोटाळा केला आहे, असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. त्याबाबतचे पुरावे सादर करीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता मुंडे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली.(Anjali Damania)
त्यांच्या आरोपामुळे महायुती सरकार आता काय भूमिका घेते?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि वाल्मिक कराड यांच्या कृष्णकृत्याचा विषय लावून धरलेल्या दमानिया यांनी जाहीर केल्याप्रमाणे मुंबईत मंगळवारी (४ फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करीत मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, ‘एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे किती पैसे खातो हे सगळ्यांना समजले पाहिजे.’ (Anjali Damania)
९२ रूपयाची बॉटल २२० रुपयाने खरेदी
नॅनो युरियाची बॉटल ९२ रुपयांची आहे. पण कृषीमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढले गेले. त्याला तब्बल २२० रुपयांना ही बॉटल विकत घेतली गेली. कृषीमंत्री यांनी १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटल्स या दुपट्टीपेक्षा जास्त किमतीने विकत घेतल्या. आणखी एका बॉटलचा बाजारभावाप्रमाण दर २६९ रुपये आहे, पण ५९० रुपयांना त्याची खरेदी केली आहे. या दोन वस्तूंमध्ये एकूण घोटाळा ८८ कोटींचा आहे. (Anjali Damania)
बॅटरी स्प्रेअर हा आधीपासून Maidcच्या वेबसाइटवर मिळतोय आत्ताच्या घटकेला २४५० रुपयांना घेतला जातो, पण कृषीमंत्री मुंडे यांनी ३४३६ रुपयांनी ते खरेदी केली. एक हजारावर बॅटरी स्प्रेअरवर कमवले आहेत. जवळपास २ लाख ३६४२७ बॅटरी स्प्रेअर विकत घेतले आणि त्याची किंमत ३ हजारवर आहे. जुलै २३ ते नोव्हेंबर २४ एका वर्षात या व्यक्तीने शेतकऱ्यांचा इतका अफाट पैसा खाल्ला असेल तर अशा लोकांना त्या पदावर राहण्याची त्यांचे मंत्रिपद ठेवण्याची खरेच गरज आहे का, याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे, असेही दमानिया म्हणाल्या. एकूण १६१.६८ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असे दमानियांनी यांनी सांगितले.
वर्षभराच्या कालावधीत या व्यक्तीने अफाट पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्रिपदावर ठेवण्याची गरज आहे का, याचा मुख्यमंत्र्यांनी गंभीर विचार करावा. तसेच भगवानगडाने मुंडेंना दिलेला पाठिंबा काढून घ्यावा, मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मागणी करावी, अशी मागणीही केली. लवकरच पुरावे घेऊन आपण भगवानगडावर जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Anjali Damania)
६ लाख १८ हजार कॉटन स्टोरेज बॅग घेतल्या. आयसीएआय नावाची संघटना आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी २० बॅग्ज ५७७ रुपयांना घेतल्या. पण मुंडेंनी टेंडरमधून १२५० रुपयांना त्या घेतल्या. ३४२ कोटीच्या टेंडरमध्ये १६० कोटी अधिक गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :