मुंबई : प्रतिनिधी : महाशिवरात्रीला महादेव मंदिरात गेलेल्या अभिनेत्री अमिषा पटेलला पाहण्यासाठी साधूंनी गराडा घातला. तिच्यासमवेत सेल्फी घेण्यासाठी साधूंमध्ये चढाओढ लागली. अखेर सुरक्षारक्षकाने साधूंना बाजूला करत तिची सुटका केली. अमिषाचा पाठलाग करणाऱ्या साधूंचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. त्यावर कॉमेंटसचा पाऊस पडत आहे. “ये कैसे बाबा, खुदही भटक गए,” अशा आशयाच्या प्रतिक्रिया येत आहेत. (Amisha patel)
महाशिवरात्रीला शंभो महादेवाचे दर्शन घेण्यासाठी अभिनेत्री अमिषा पटेल मुंबईतील जुहू येथील शिव मंदिरात गेली होती. तिला पाहताच लोकांनी गराडा घातला. तिच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी साधूंमध्ये चढाओढ लागली. अखेर कशीबशी अमिषा साधूंच्या तावडीतून बाहेर पडली. त्यानंतर तिने देवाचे दर्शन घेतले. (Amisha patel)
मंदिराच्या परिसरात अनेक साधू तर अमिषा सोबत सेल्फी घेण्यासाठी प्रयत्न करत होते. साधूंनी अमिषाला अक्षरश: गराडा घातला. सर्वच साधू तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धावले. साधूंच्या गराड्यातून अमिषा पटेलला मदत करण्यासाठी मंदिरातील सुरक्षा रक्षकाला धाव घ्यावी लागली. त्याने एकेक साधूला पकडून अमिषापासून बाजूला केले. सुरक्षारक्षकाच्या मदतीबद्दल अमिषाने त्याचे आभार मानले. साधूंनी घातलेला गराडा आणि सेल्फी घेण्याच्या प्रयत्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. (Amisha patel)
“साधू असूनही हिरॉईनच्या मागे, परमेश्वरात मन लागत नाही वाटतं…”
दुसरी प्रतिक्रिया एकदम भारी आहे. “बाबांचे काम भटकलेल्यांना योग्य मार्ग दाखवायचा. इथे मात्र ते अमिषा पटेलला रस्ता दाखवायला निघाले आहेत, असे कधी होते का?” ‘‘साधूही सेल्फी घ्यायला लागलेत?. एकंदरीत साधूही अमिषाचा गदर टू चित्रपट पाहून तिच्या प्रेमात पडले असावेत,’’ अशी प्रतिक्रिया उमटली आहे.
हेही वाचा :
पुणे हादरले; शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार
महाशिवरात्रीच्या स्नानाची साधली पर्वणी