Home » Blog » अंबानी, अदानी भाजपचे दोन मोठे एटीएम

अंबानी, अदानी भाजपचे दोन मोठे एटीएम

काँग्रेस नेते उदित राज यांची टीका

by प्रतिनिधी
0 comments
Udit Raj file photo

नवी दिल्लीः  काँग्रेस नेते उदित राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एटीएम’बाबत केलेल्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे. उदित राज म्हणाले, की भाजपने आठ नोव्हेंबर २०१६ रोजी संपूर्ण देशातील जनतेला भाजपचे ‘एटीएम’ बनवले होते. भाजपसाठी ‘इलेक्टोरल बाँड’पेक्षा मोठे ‘एटीएम’ असू शकते का? संपूर्ण देशातील जनता त्यांचे ‘एटीएम’ बनली आहे. उदित राज म्हणाले, ‘ज्या बँका लुटल्या जात आहेत आणि सुमारे २५ लाखांची कर्जमाफी केली जात आहे, तेही भाजपचे ‘एटीएम’ आहे. भाजपचे दोन मोठे ‘एटीएम’ अंबानी आणि अदानी आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सभेत काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हटले होते, की ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार बनते ते राज्य काँग्रेसच्या राजघराण्याचे एटीएम बनते. यावर आता काँग्रेसने पलटवार केला आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी काँग्रेस कर्नाटकात पैसे उकळत असल्याचे मोदी यांनी म्हटले होते. याला प्रत्युत्तर देताना उदित राज म्हणाले, की तुम्ही कर्नाटकबाबत काय बोललात त्याचे पुरावे द्या. पंतप्रधानांना बेजबाबदारपणे बोलणे शोभते का? पीएम जे बोलले त्याचा पुरावा काय, आम्ही त्यांच्याविरोधात बरेच पुरावे दिले आहेत.

भाजपच्या घोटाळ्यांची माहिती देताना उदित राज म्हणाले, की मोदी यांनी ५०० कोटी रुपयांचे राफेल १६०० कोटींना खरेदी केले, हा सरळसरळ घोटाळा आहे. भाजपला काँग्रेसविरुद्ध एकही घोटाळा सिद्ध करू द्या. मोदीजींच्या हजारो घोटाळ्यांचे पुरावे आपण देऊ शकतो. इथे लोकशाही उरलेली नाही. १० वर्षात एकही भ्रष्टाचार झाला नाही, असे भाजप म्हणते. ‘सीबीआय’, ‘ईडी,’ प्राप्तिकर विभाग खिशात ठेवले, तर भ्रष्टाचार झाला असे कोण म्हणेल.

मोदी यांनी शनिवारी महाराष्ट्रातील अकोला येथे निवडणूक प्रचारसभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार बनते ते काँग्रेसच्या राजघराण्याचे ‘एटीएम’ बनते, असे पंतप्रधान म्हणाले होते. आजकाल हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक ही राज्ये काँग्रेसच्या राजघराण्याची ‘एटीएम’ बनली आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नावाखाली कर्नाटकातील संकलन दुपटीने वाढल्याचे लोक म्हणत आहेत. या लोकांनी कर्नाटकातील दारू दुकानदारांकडून ७०० कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप आहे. जो काँग्रेस पक्ष घोटाळे करून निवडणूक लढवत आहे, तो निवडणूक जिंकल्यानंतर किती घोटाळे करणार, असा सवाल मोदी यांनी केला होता

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00