नवी दिल्ली : खासदार शरद पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.१२) सकाळी दिल्ली येथे भेट घेतली. पवारांचा आज ८४ व्वा वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार गेले होते. त्यांच्यासमवेत खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, आमदार छगन भुजबळ, खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. (Ajit Pawar)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली नव्हती. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत दोन्ही पवारांनी जाहीर प्रचारात टीकाटिपण्णी केली होती. पवार कुटुंबातील सणासुदीच्या कार्यक्रमाला काका-पुतणे एकत्र आले नव्हते. दरम्यान राज्यातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार हे काल (दि.११) रात्री दिल्ली येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी आले आहेत. आज शरद पवारांचा वाढदिवस असल्याने सकाळी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे स्वागत केले.
भेटीबाबत पत्रकारांनी अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शरद पवार यांचा आज आणि काकींचा वाढदिवस उद्या असल्याने त्यांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला राजकीय सुस्कृंतपणा दिला असल्याने राजकीय मतभेद असले तरी नातेसंबध कायम ठेवणे ही संस्कृती आहे. पवार यांच्यासोबत नाष्टा, चहापाणी घेतले. यावेळी लोकसभा, राज्यसभेतील कामकाज, मंत्रीमंडळाचा विस्तार, राज्यातील हिवाळी अधिवेशन यावर जनरल चर्चा झाली. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. (Ajit Pawar)
हेही वाचा :
- Santosh Deshmukh Murder बीडचा बिहार झाल्याची विरोधकांची टीका
- World Tour Badminton : ट्रिसा-गायत्री जोडीचा पराभव
- India lost : स्मृतीच्या शतकानंतरही भारताचा पराभव