मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रातील राजकारणात पवार काका-पुतण्यांच्या राजकारणाचा अंदाज कोणालाही लावणे शक्य नाही, याचा प्रत्यय महाराष्ट्रातील राजकारण्यांना पुन्हा एकदा बुधवारी (२ एप्रिल) प्रत्ययास आला. पुतणे म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्यापासून फार करीत जवळपास दोन वर्षापासून महायुती सहभागी झाले असताना दस्तरखुद्द त्यांनीच बीडमधील कार्यक्रमात चुलत्याच्या कृपेमुळे आपले मस्त चालले आहे असे विधान केले. या विधानावरून पुन्हा एकदा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.(Ajit pawar)
त्यांच्या विधानाबाबत सत्ताधारी व विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्याने त्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी आज तेथील एका कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांना दम देताना चांगले वागण्याचा सल्ला दिला. यावेळी आई-वडील आणि चुलत्याच्या आशीर्वादामुळे आपले चांगले सुरू असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे हा विषय चर्चेचा बनला. (Ajit pawar)
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे हे चांगलेच असते. त्यांनी आता आपल्या काकांना केवळ आशीर्वाद देण्यापुरतेच ठेवले आहे, असा टोला लगावला. (Ajit pawar)
शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या आहेत. आमची विचारधारा ही शरद पवारांच्या विचारावर चालणारे आहे. जातीयवादी शक्तीला कधीही आम्ही सोबत जात नाही. त्यामुळे अजित पवार यांनी काहीही भाष्य करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र यावरून अजित पवारांना टोला लगावला. ते म्हणाले की, बरे झाले एकदा त्यांनी एकदा मान्य तरी केले की आपले कर्तृत्व हे काकाच्याच जीवावर आहे.
हेही वाचा :
उद्योगपती, बिल्डरांना जमिनी देण्याचा डाव
तर ‘ते’ वक्फ बिलाला पाठिंबा देतील…