महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ११ ऑक्टोबर रोजी ८२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेक क्षेत्रातील लोकांनी प्रत्यक्ष, समाज माध्यमांतून त्यांना शुभेच्छा दिल्या. आता चर्चा सुरू झाली आहे ऐश्वर्याने त्यांना दिलेल्या शुभेच्छांची. लक्षवेधी गोष्ट म्हणजे ऐश्वर्यानं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिवसाच्या शेवटी एक पोस्ट शेअर केली आहे. गेल्या सहा महिन्यापासून ऐश्वर्याने सोशल मीडियावर एकही पोस्ट केली नव्हती. इतक्या काळानंतर पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. ऐश्वर्याच्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
Amitabh Bachchan : आराध्यासोबतचा केला फोटो शेअर
गेल्या अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्याच्यामध्ये वाद असल्याच्या चर्चांमध्ये ऐश्वर्याच्या या पोस्टनं सगळ्यांचं तोंड बंद केलं आहे. ऐश्वर्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अमिताभ यांचा आराध्यासोबतचा बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. अमिताभ यांनी आराध्याला मिठी मारली आहे. हा फोटो शेअर करत ऐश्वर्यानं कॅप्शन दिलं की, वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा-आजोबा. देव नेहमीच तुमच्यासोबत राहो. ऐश्वर्यानं शेअर केलेला हा फोटो पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
ऐश्वर्यानं शेअर केलेल्या या पोस्टवर कमेंटमध्ये एक नेटकरी म्हणाला की ‘बरेच लोक बोलत होते की त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्या सगळ्यांच्या प्रश्नासाठी हे काही न बोलता देण्यात आलेलं उत्तर आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ऐश इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत जा.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जा.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘आम्हाला तुला देखील पाहायचं आहे. तुझे फोटो देखील शेअर करत रहा.’
हेही वाचा
- मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
- अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
- झी-सोनी’कडून सामोपचाराने वादावर पडदा