वॉशिंग्टन : ‘इसिस’चा म्होरक्या अब्दुल्लाह मक्की मुसलिह अल-रिफाई, उर्फ “अबू खादीजाह” याचा खात्मा करण्यात आला. यूएस सेंट्रल कमांड (सेंटकॉम) च्या सैन्याने इराकी गुप्तचर आणि सुरक्षा दलांच्या समन्वयाने ही मोहीम फत्ते केली. या आठवड्याच्या सुरुवातीला ही संयुक्त कारवाई करण्यात आली. एअर स्टाईकच्या माध्यमातून त्याला अचूक टिपण्यात आले. (Air Strike)
‘सेंटकॉम’ने जाहीर केल्यानुसार, अबू खादीजाह या इसिसचा दुसरा सर्वोच्च दर्जाचा प्रमुख होता. तो या गटाचा जागतिक ऑपरेशन्सचा प्रमुख होता. त्याच्यावर एका अचूक हवाई हल्ला करण्यात आला. त्याचा आणखी एक सहकारी यात मारला गेला.
१३ मार्च रोजी, यूएस सेंट्रल कमांडच्या सैन्याने इराकी गुप्तचर आणि सुरक्षा दलांच्या सहकार्याने इराकमधील अल अनबार प्रांतात एक अचूक हवाई हल्ला केला. यात इसिसचा दोन नंबरचा प्रमुख ग्लोबल ऑपरेशन्स आणि डेलिगेटेड कमिटी अमीरचा प्रमुख – अब्दुल्लाह मक्की मुसलिह अल-रिफाई, उर्फ ”अबू खादीजाह” आणि आणखी एक इसिस दहशतवादी ठार झाला, असे यूएस सेंट्रल कमांडने म्हटले आहे. . (Air Strike)
अमेरिकेने २०२३ मध्ये अबू खादीजाहवर बंदी घातली होती, त्याला इराक आणि सीरियामधील इसिस-नियंत्रित प्रदेशांचे तथाकथित गव्हर्नर म्हणून ओळखले होते. तो या गटाच्या परदेशी कारवाया आखत असे. २०१७ मध्ये इराकमध्ये इसिसचा पराभव झाला असला तरी, या गटाच्या कारवाया अधूमधून सुरूच असतात. त्यांनी इराकी सुरक्षा दलांवर तुरळक हल्ले केले आहेत. . (Air Strike)
“आज इराकमधील इसिसचा फरार नेता मारला गेला. आमच्या धाडसी युद्धसैनिकांनी त्याचा अथकपणे शोध घेतला. इराकी सरकार आणि कुर्दिश प्रादेशिक सरकारच्या समन्वयाने इसिसच्या आणखी एका सदस्यासह त्याला संपवले गेले,” असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे. . (Air Strike)
“शक्तीद्वारे शांतता!” असेही त्यांनी पुढे म्हटले.
दहशतवादविरोधी लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आणि इराकी सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी सुमारे २,५०० अमेरिकन सैन्य इराकमध्ये तैनात आहे. . (Air Strike)
या हवाई हल्ल्यानंतर सेंटकॉम आणि इराकी सैन्याने मागील छाप्यातील डीएनए जुळणीद्वारे ती जागा सुरक्षित केली. तेथे त्यांनी अबू खादीजाहची ओळख पटवली. “हल्ल्यानंतर, सेंटकॉम आणि इराकी सैन्याने हल्ल्याच्या ठिकाणी धाव घेतली आणि त्यांना दोन्ही मृत दहशतवादी आढळले. दोन्ही दहशतवाद्यांनी न फुटलेले “सुइसाइड जॅकेट” घातले होते. त्यांच्याकडे अनेक शस्त्रे होती,” असेही अमेरिकन सैन्याने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.