Home » Blog » AI Workshop:‘एआय’चा वापर माध्यमांत कसा कराल

AI Workshop:‘एआय’चा वापर माध्यमांत कसा कराल

माध्यमांत काम करणाऱ्यांसाठी पर्वणी

by प्रतिनिधी
0 comments
AI Workshop

कोल्हापूर ः मराठी पत्रकार दिनानिमित्त राज्यातील विविध विद्यापीठातील पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माध्यमे’ या विषयावर विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीचे संपादक सम्राट फडणीस आणि थिंक बँकचे संस्थापक विनायक पाचलग मार्गदर्शन करणार आहेत. गुगल मीट, झूम आणि युट्यूबवर व्याख्यानाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.( AI Workshop)
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, मुंबई येथील श्रीमत नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने  कार्यक्रम होणार आहे. ( AI Workshop)

कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थी, पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रा. डॉ. सुधीर भटकर (जळगाव), प्रा. डॉ. निशा मुडे-पवार (कोल्हापूर), प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर (सोलापूर), प्रा. डॉ. दिनकर माने (औरंगाबाद), प्रा. डॉ. संजय तांबट (पुणे), प्रा. डॉ. सुंदर राजदीप (मुंबई), प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर (नांदेड), प्रा. डॉ. मोईज हक (नागपूर), प्रा. डॉ. मीरा देसाई (मुंबई) यांनी केले आहे.

सहभागासाठी लिंक :
https://m.youtube.com/@SchoolofmediaKBCNMUJalgaon

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00