Home » Blog » Afghan-Pak : अफगाण फौजांचे पाकला प्रत्युत्तर

Afghan-Pak : अफगाण फौजांचे पाकला प्रत्युत्तर

लष्करी तळांवर हल्ले केल्याची संरक्षण मंत्रालयाची माहिती

by प्रतिनिधी
0 comments

काबूल : पाकिस्तानने या आठवड्यामध्ये अफगाणिस्तानातील पाक्तिका प्रांतावर केलेल्या हवाईहल्ल्यांना अफगाणिस्तानकडून शनिवारी प्रत्युत्तर देण्यात आले. पाक्तिका हल्ल्यांसाठी वापरण्यात आलेल्या पाक फौजांच्या तळांनाच लक्ष्य करण्यात आल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. (Afghan-Pak)

अफगाणिस्तानने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकच्या निमलष्करी दलाचा एक जवान ठार झाला असून अन्य सात जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानने शनिवारच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या सीमावर्ती प्रदेशातील कुर्रम जिल्हामधील दोन ठिकाणांना लक्ष्य केले. अफगाणिस्तानमध्ये २०२१ साली तालिबानची सत्ता आल्यानंतर दोन्ही देशांमध्ये सातत्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होत आहे. (Afghan-Pak)

दरम्यान, पाकने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अफगाणिस्तानच्या खोस्त शहरामध्ये शनिवारी निदर्शने करण्यात आली. शेकडो अफगाणी नागरिक या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. पाकने पाक्तिकावर केलेल्या हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानमधील ४६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये मोठ्या संख्येने महिला व लहान मुलांचा समावेश होता. तथापि, हवाईहल्ल्यांमध्ये आपण केवळ दहशतवादी तळांनाच लक्ष्य केल्याचे पाकिस्तानी सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सूचित केले होते. पाकिस्तान सरकारकडून या हवाई हल्ल्यांविषयी कोणतेही औपचारिक विधान करण्यात आले नव्हते. (Afghan-Pak)

 

हेही वाचा :

पाकचे अफगाणिस्तानवर हवाई हल्ले
मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अझरला हृदयविकाराचा झटका

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00