Home » Blog » Aditya Thackray: मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचाय

Aditya Thackray: मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचाय

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची टीका

by प्रतिनिधी
0 comments
Aditya Thackray

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकार महाराष्ट्राचे मणिपूर करू पाहत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी (१८ मार्च) केली.(Aditya Thackray)

नागपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी ही टीका केली. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत सोमवारी नागपुरात निदर्शने केली. त्यानंतर धार्मिक विटंबना झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे हिंसाचार उसळला. त्यात २५ पोलिस आणि अधिकारी जखमी झाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाषण करताना नागपूर हिंसाचाराला ‘पूर्वनियोजित हल्ला’ असे म्हटले.

‘नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने निदर्शने केली. धार्मिक मजकूर असलेल्या वस्तू जाळल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या. हा सुनियोजित हल्ला असल्यासारखे दिसते. कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणाऱ्याची गय केली जाणार नाही. आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही,’ असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. (Aditya Thackray)

हिंसाचारावर सरकारने जे स्पष्टीकरण दिले आहे ते सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालयाची निष्क्रियता दाखवणारे आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

‘नागपूरमध्ये हिंसाचाराच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री कार्यालयाने पावले का उचलली नाहीत? जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा पहिला अहवाल राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह विभागाकडे येतो. त्यांच्याकडे याबद्दल कोणतीही माहिती नव्हती का? मला वाटते की भाजप महाराष्ट्राला पुढचे मणिपूर करू इच्छित आहे,’ असे ठाकरे म्हणाले. (Aditya Thackray)

अंतर्गत संघर्ष विकासात अडथळा आणतात, असे सांगून ठाकरे यांनी व्हिएतनाम आर्थिक प्रगती, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील प्रगतीकडे लक्ष वेधले.

‘मणिपूरमध्ये २०२३ पासून राज्यात हिंसाचार सुरू आहे. राज्यात सर्वत्र संघर्ष सुरू आहेत. तिथे गुंतवणूक होईल की पर्यटनात वाढ होईल? तर अजिबात नाही. ते महाराष्ट्रालाही त्याच परिस्थितीत आणू इच्छित आहेत. व्हिएतनाम हा भारतापेक्षा लहान देश आहे आणि लोकसंख्याही कमी आहे, परंतु त्यांचा इलेक्ट्रॉनिक उद्योग ३ पट जास्त आहे. आपला देश शक्तिशाली आहे. मात्र भाजप देशाला जिल्ह्यांमध्ये, धर्मांमध्ये आणि जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहे,’ असा आरोपही ठाकरे यांनी केला. (Aditya Thackray)

तीन पोलिस उपायुक्तांसह ३३ पोलिस जखमी

नागपूरमधील हिंसाचाराबाबत सभागृहात निवेदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, तीन पोलिस उपायुक्तांसह ३३ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. एका डीसीपीवर कुऱ्हाडीने हल्ला झाला आहे. पाच नागरिकही जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांना उपचारानंतर सोडण्यात आले. एकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (Aditya Thackray)

‘हिंसाचाराच्या ठिकाणांहून आम्हाला दगडांची एक ट्रॉली मिळाली आहे. काही विशिष्ट घरे आणि संस्थांना लक्ष्य करण्यात आले होते. एका डीसीपीवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता. आम्ही निश्चितच कारवाई करू. ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था स्वतःच्या हातात घेतली त्यांना सोडले जाणार नाही. पोलिसांवर हल्ला सहन केला जाणार नाही,’ असा इशारा फडणवीस यांनी दिला.

हेही वाचा :
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी कबर तोडावी
सरकार, फडणवीस पुरस्कृत दंगल
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00