नवी दिल्ली : प्रतिनिधी : अमेरिकन सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने अदानी ग्रुपचे संस्थापक गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्याविरुद्ध कथित सिक्युरिटीज फसवणूक आणि २६५ दशलक्ष डॉलर्सच्या लाच प्रकरणाच्या चौकशीसाठी भारताकडे मदत मागितली आहे. या मागणीला भारत कसा प्रतिसाद देतो याकडे आर्थिक जगताचे लक्ष लागले आहे. (Adani scam)
न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. अदानी ग्रुपचे संस्थापक गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यावरील तक्रारीची दखल घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी भारताच्या कायदा मंत्रालयाची मदत घेत घेण्यात येत आहे. अदानी आणि त्यांचा पुतण्या अमेरिकेच्या ताब्यात नाहीत. ते दोघेही भारतात आहेत. “एसईसीने हेग सेवा कराराअंतर्गत भारताला मदतीची विनंती केली आहे” असे न्यायालयीन प्रक्रियेत म्हटले आहे. (Adani scam)
गेल्या वर्षी ब्रुकलिनमधील संघीय अभियोक्तांनी अदानी ग्रीन एनर्जीद्वारे उत्पादित वीज खरेदी करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप आरोपपत्रात उघड केला होता. कंपनीने अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल केली असे आरोपपत्रात म्हटले आहे.
अदानी समूहाने त्यांच्यावर केलेल्या आरोप फेटाळले असून आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. तसेच या आरोपाबद्दल सर्व शक्य ते कायदेशीर मार्ग अवलंबणार असल्याचे म्हटले आहे. अदानी ग्रीनने सांगितले की, त्यांनी अमेरिकेतील आरोपांचे पुनरावलोकन करण्यासाठी स्वतंत्र कायदा संस्थांची नियुक्ती केली आहे. (Adani scam)
अदानींच्या भ्रष्टाचाराच्याविरोधात यापूर्वीच काँग्रेस पक्षाने गौतम अदानी यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच अदानींना मोदी सरंक्षण देत आहेत आणि भूतकाळातील व्यवहारामध्ये त्याची बाजू घेतल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे आरोप भाजप आणि अदानी ग्रुपने फेटाळले आहेत. (Adani scam)
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद मोदी यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी अदानीसंबंधी प्रश्न विचारला असता पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी कोणतीच चर्चा केली नाही, असे स्पष्ट केले. हा एक वैयक्तिक मुददा असून त्यावर नेत्यांनी कधीही चर्चा केली नाही असे मोदींनी स्पष्ट केले होते.
हेही वाचा :
सिद्धरामय्यांविरोधात पुरावे नाहीत
सीबीएसई वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेणार