कोल्हापूर : प्रतिनिधी : पाच हजार रुपयांची लाच घेताना दोन ग्रामविकास अधिकाऱ्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जाळ्यात पकडले. मृत्यूचा दाखला आणि राहत्या घराचा उतारा देण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती. सचिन बाळकृष्ण मोरे (वय ४४) आणि प्रथमेश रवींद्र डंबे (वय २२, दोघेही रा. जुने पारगाव ता. हातकणंगले) अशी लाच घेणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची नावे आहेत. (ACB trap)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली. तक्रारदारांना त्यांच्या सासऱ्याचा मृत्यू दाखला आणि राहत्या घराचा उतारा पाहिजे होता. त्यासाठी त्यांनी परखंदळे व बांबवडे ग्रामपंचायतील ग्रामविकास अधिकारी सचिन मोरे यांच्याकडे अर्ज दिला. त्यांनी दाखले देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची खातरजमा केल्यावर सापळा रचला. ग्रामविकास अधिकारी सचिन मोरे यांनी लाचेच्या रक्कमेत तडजोड करत पाच हजारांची लाच मागितली. त्यानंतर ग्रामविकास मोरे यांनी पाच हजार रुपयांची लाच शाहूवाडी तालुक्यातील साळशी पिशवीचे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रथमेश डंबे यांना देण्यास सांगितले. डंबे पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी सचिन मोरे आणि प्रथमेश डंबे यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. (ACB trap)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअन क्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, पोलिस हवालदार अजय चव्हाण, पोलिस नाईक सुधीर पाटील, कॉन्स्टेबल कृष्णात पाटील, सहाय्यक फौजदार कुराडे यांनी कारवाई केली.
हेही वाचा :
जिल्हा न्यायाधीश ‘एसीबी’च्या जाळ्यात
सोशल मीडियावरून रिलस्टारचा देहविक्री व्यवसाय