कोल्हापूर : प्रतिनिधी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेतकऱ्याची जमीन नावावर करुन घेण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मंडल अधिकाऱ्यांना दोन पंटरनांना सापळा रचून पकडले. पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावातील मंडल कार्यालयात ही कारवाई केली. मंडल अधिकारी अरुण भानुदास माळगे (वय ४९, रा. शिराळा नाका, कचरे गल्ली, इस्लामपूर, ता. वाळवा) याला योगेश यशवंत गावडे (२९, रा. शिनगारे गल्ली, कोडोली, ता. पन्हाळा) व सुशांत सुभाष चौगुले (३०, रा. शहापूर, ता. पन्हाळा) अशी अटक केलेल्या लाचखोरांची नावे आहेत. (ACB raid)
तक्रारदाराने कोडोली येथील एका शेतकर्याची शेतजमीन नावावर करणेकरिता पन्हाळा महसूल विभागाकडे एक महिन्यापूर्वी ऑनलाईन अर्ज केला होता. हा अर्ज तपासणी व पुढील कार्यवाहीसाठी कोडोली येथील मंडल अधिकारी कार्यालयात आला होता. मंडल अधिकारी माळगे याचा पंटर योगेश गावडे याने तक्रारदारला मंगळवारी (दि ११) कार्यालयात बोलवून घेतले. तक्रारदार बराचवेळ कार्यालयात थांबले. मंडल अधिकारी माळगे भेटू न शकल्याने तक्रारदार निघून गेले. (ACB raid)
पुन्हा पंटर गावडे याने तक्रारदाराच्या दुकानात जाऊन भेटून शेतजमीन सातबारा पत्रकी नोंद करण्यासाठी मंडल अधिकार्यास अडीच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यावेळी तक्रारदार व मंडल अधिकारी यांच्यामध्ये तडजोड होऊन दोन हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारदारांच्या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान पथकाने सापळा रचून मंडल अधिकारी कार्यालयातच तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना पंटरला रंगेहाथ पकडण्यात आले.(ACB raid)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुंखे, सुनील घोसाळकर, सचिन पाटील, संदीप पवार, गजानन कुराडे यांनी कारवाई केली.
हेही वाचा :
गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरसह तिघींना अटक
पाच लाखाच्या दागिन्यांसाठी आजीचा खून