Home » Blog » Abu Azmi Suspended : अबू आझमी विधानसभेतून निलंबित

Abu Azmi Suspended : अबू आझमी विधानसभेतून निलंबित

औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य भोवले

by प्रतिनिधी
0 comments
Abu Azmi Suspend

मुंबई : प्रतिनिधी : औरंगजेब चांगला प्रशासक होता असे वक्तव्य करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले. विधानसभेत त्यांच्या निलंबनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. निलंबन काळात त्यांना विधानसभेच्या आवारात येण्यासही बंदी घातली आहे. (Abu Azmi Suspended)

‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असे वक्तव्य आमदार अबू आझमींनी केले. त्यांच्या विधानाचा सार्वत्रिक निषेध झाला. मंगळवारी विधानसभा आणि विधान परिषदेत आझमींच्या वक्तव्यावर सदस्यांनी टीका केली.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझमींच्या वक्तव्याचा निषेध केला. औरंगजेबाच्या वक्तव्याबद्दल अबू आझमींना सभागृहातून निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली. निलंबनाच्या मागणीनंतर आमदार आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्य मागे घेतो असे सांगून माघारही घेतली. पण बुधवारी मात्र त्यांच्या निलंबनाचा ठराव सभागृहाने एकमताने मंजूर केला. (Abu Azmi Suspended)

आज बुधवारी विधानसभेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांना निलंबित करावे असा ठराव मांडला. ठरावात चंद्रकांत पाटील असे म्हणाले, “अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब उत्तम प्रशासक होता अशी त्याची भलामण करणारे आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यांची वक्तव्ये आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहेत. त्यामुळे सभागृहाचा अपमान झाला आहे. अबू आझमींनी विधानसभेची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे ही विधानसभा असा ठराव करते की अबू आझमीचे यांचे सदस्य अर्थसंकल्प अधिवशेनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत निलंबन करावे”. (Abu Azmi Suspended)

मंत्री पाटील यांनी प्रस्ताव मांडल्यानंतर भाजपचे आमदार सुधीर मुनगुंटीवार यांनी अबू आझमींचे निलंबन दीर्घ काळासाठी करावे, अशी मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण देव किंवा देवापेक्षा जास्त मानतो. शिवरायांचा अपमान अबू आझमींनी केला आहे, असेही मुनगुंटीवर म्हणाले. (Abu Azmi Suspended)

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आमदारांचा कौल घेतला. सभागृहात एकमताने अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अर्थसकंल्पीय अधिवेशन संपेपर्यंत आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबन काळात आझमींना विधानसभेच्या परिसरात बंदी घालण्यात आली आहे. (Abu Azmi Suspended)

हेही वाचा :

भाजपच्या जयकुमार गोरेकडून महिलेचा छळ

फेसबुक फ्रेंडने केला काँग्रेस कार्यकर्तीचा खून

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00