Home » Blog » Abhishek Ranking : अभिषेकची दुसऱ्या स्थानी झेप

Abhishek Ranking : अभिषेकची दुसऱ्या स्थानी झेप

गोलंदाजांच्या क्रमवारीत वरुणही दुसऱ्या स्थानावर

by प्रतिनिधी
0 comments
Abhishek Ranking

दुबई : इंग्लंडविरुद्ध झंझावाती शतक झळकावणारा भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती संयुक्त दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. (Abhishek Ranking)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी नवी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये फलंदाजी क्रमवारीत भारताच्या तिघांनी आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळवले. अभिषेक दुसऱ्या, तिलक वर्मा तिसऱ्या, तर सूर्यकुमार यादव पाचव्या स्थानावर आहे. अभिषेकने या मालिकेत १ शतक व १ अर्धशतकासह २७९ धावा केल्या. अखेरच्या वन-डेमध्ये त्याने चेंडूंमध्ये विक्रमी १३५ धावांची खेळी केली. या कामगिरीच्या आधारे त्याने क्रमवारीत तब्बल ३८ स्थानांची झेप घेतली आहे. त्याच्या नावावर आता ८२९ गुण आहेत. मागील आठवड्यात तो या क्रमवारीत चाळीसाव्या स्थानी होता. तिलक व सूर्यकुमार यांचे स्थान मात्र एकने घसरले आहे. तिलकचे ८०३, तर सूर्यकुमारचे ७३८ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड या क्रमवारीत ८५५ गुणांसह अव्वलस्थानी आहे. (Abhishek Ranking)

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत १४ विकेटसह मालिकावीर ठरलेला वरुण चक्रवर्ती टी-२० गोलंदाजांमध्ये संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. वरुणचे या क्रमवारीतील स्थान तीनने सुधारले आहे. मागील आठवड्यात तो पाचव्या स्थानी होती. त्याचे व इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीद या दोघांचेही ७०५ गुण आहेत. वेस्ट इंडिजचा अकिल हुसेन हा ७०७ गुणांसह अग्रस्थानी आहे. भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोईचे स्थानही चारनी सुधारले असून तो ६७१ गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. टी-२० अष्टपैलूंच्या क्रमवारीत भारताचा हार्दिक पंड्या २५१ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. (Abhishek Ranking)

हेही वाचा :

वन-डे सामन्याच्या तिकिटांसाठी झुंबड

भारतीय संघाच्या ‘थ्रोडाउन’ सहायकास अडवले

वरुण चक्रवर्तीला ‘प्रमोशन’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00