महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्रीय निवडणूक आयोगाने ३ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. राज्य सरकारने या सूचनांचे पालन करत १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. (Maharashtra Police)
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कर्यवाही झाली आहे. यापैकी मुंबईत ११ पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे. निवडणूक आयोगाने मुंबईतील पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांची सूचना राज्य पोलीस दलाला केली होती. मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या मुंबईबाहेर करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने सूचना पाळल्या नाहीत
लोकसभेच्या वेळी निवडणूक आयोगाने राज्य सरकारला अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या. त्या सूचना राज्य सरकारने पाळल्या नव्हत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली होती. मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्टासह इतर ४ राज्यांच्या ३ वर्षांपेक्षा ज्सत सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आयोगाने राज्य सरकारवर ताषेरे ओढले होते. (Maharashtra Police)
- आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा उठवणार: राहुल गांधी
- पी.एम. किसान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा
- महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक धक्का