Home » Blog » Mumbai Unsafe : सलमान, सिद्दीकी आणि सैफ

Mumbai Unsafe : सलमान, सिद्दीकी आणि सैफ

मुंबई ‘अनसेफ’ करण्याचे प्रयत्न ?

by प्रतिनिधी
0 comments
Mumbai Unsafe

मुंबई : प्रतिनिधी : सेलिब्रेटीसाठी सेफ सिटी म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहरात गेल्या दहा महिन्यांत तीन सेलिब्रिटीजवर हल्ले झाले. १४ एप्रिल रोजी सलमान खानच्या घरावर दोघांनी गोळीबार केला. दसऱ्या दिवशी, १२ ऑक्टोबर रोजी आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.  आज, १६ जानेवारीला अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चाकूहल्ला करण्यात आला. हल्ले झालेल्या तीनही घटनेतील व्यक्ती बॉलिवूडशी संबंधित आहेत. सुरक्षित मुंबई असुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.(Mumbai Unsafe)

सलमानच्या घरावर गोळीबार

१४ एप्रिल २०२४ रोजी सलमानच्या घरावर दोघांनी पहाटे गोळीबार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबई पोलिसांचा शहरात कडेकोट बंदोबस्त असताना सलमानच्या घरावर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. मुंबई पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत गोळीबार करणाऱ्या दोघांच्या मुसक्या भूज येथून आवळल्या. विकी गुप्ता, सागर पाल अशी या दोघांची नावे आहेत. गोळीबारापूर्वी सलमानला विष्णोई टोळीकडून धमकी मिळाली होती. विकी गुप्ता आणि सागर पाल हे दोघेही विष्णोई टोळीशी संबंधित आहेत. दोघांनी सलमानच्या घराची रेकीही केली होती, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली. (Mumbai Unsafe)

दसऱ्यादिवशी सिद्दीकींची हत्या

दुसरी घटना १२ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली. काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या बाबा सिद्दीकींची दसऱ्या दिवशीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकींचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकींच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाला. घटनास्थळी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी दोघांना पकडले होते तर एक हल्लेखोर पळून गेला. ताब्यात घेतलेली एक व्यक्ती हरियाणातील तर दुसरी व्यक्ती उत्तरप्रदेशातील होती. दोघेही बिष्णोई टोळीशी संबंधित आहेत. दसऱ्या दिवशी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्ही पक्षांचे दसरा मेळावे होते. यावेळी मुंबईत चोख बंदोबस्त असतानाही सिद्दीकींवर हल्ला झाला. तिसरा शूटर शिवकुमार उर्फ शिवालाही अटक करण्यात आली. लॉरेन्स बिष्णोई आणि अनमोल बिष्णोई यांनी दहशत माजवण्यासाठी संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून सिद्दीकींची हत्या केली होती, असे पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. अनमोल बिष्णोईसह २९ आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपी अद्याप फरारी आहेत.(Mumbai Unsafe)

सैफवर चाकूहल्ला

तिसरा घटना १६ जानेवारीची. अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे पश्चिम येथील घरात घुसून त्याच्यावर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सैफ जखमी झाला असून त्याच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हल्ला झाला आहे. मुंबई पोलिसांनी हल्ल्याचा तपास सुरू केला असून सात पथके तयार केली आहेत. त्यातील एक पथक मुंबईबाहेर गेले आहे. चकमक फेम दया नायक यांनीही सैफच्या घराची तपासणी केली. काल १५ जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी मुंबईत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Mumbai Unsafe)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00