प्रयागराज : महाकुंभ मेळाव्यात आलेल्या अनेक साधू, संतांच्या कथा, त्यांनी योगाच्या आधारे घडवलेले चमत्कार, त्यांची वेशभूषा यांची चर्चा समाजमाध्यमांत होत आहे. देशोदेशीचे अनेक पर्यटकही महाकुंभ अनुभवण्यासाठी येत आहेत. ‘ॲपल’चे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांची पत्नीही कुंभमेळ्यासाठी दाखल झाली आहे. त्यातच एक व्हिडीओ समाजमाध्यमांत तुफान व्हायरल झाला आहे. तो आहे हरियाणातील आयआयटीयन बाबा अभय सिंगचा.(IITian Baba)
आयआयटी बॉम्बेचा माजी एरोस्पेस अभियांत्रिकी विद्यार्थी असल्याचा दावा तो या व्हिडीओत करत असल्याचे दिसते. व्हायरल व्हिडिओंमध्ये, ‘मी आयआयटी-बॉम्बेमध्ये चार वर्षे शिकलो. तेथून एमडीएस केले. पण काहीतरी चुकले. शेवटी मला सत्य गवसले,’ असे सांगत असल्याचे दिसते. (IITian Baba)
अत्यंत प्रतिष्ठेची नि त्याचवेळी अत्यंत कठीण असलेल्या आयआयटीमध्ये प्रवेश असूनही, गळ्यात रुद्राक्ष माळ आणि भगवी कफनी घातलेला सिंग आपले उज्ज्वल कारकीर्द त्यागून अध्यात्माच्या मार्गावर चालू लागला आहे.
आयुष्यात एकदम असे वळण घेण्यास कशाने प्रवृत्त केले असे विचारले असता सिंग सांगाते, ‘मला शेवटी सत्य समजले आहे… ज्ञान के पीछे चलते जाओ, चलते जाओ, और कहां जाओगे, यहीं आओगे (ज्ञानाच्या मार्गावर चालत रहा, तू कुठे जाशील, तू इथेच तुझ्या मुळाशी येशील.) (IITian Baba)
सिंगचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरू लागले, तसतसे ‘आयआयटी-बॉम्बे’ही ट्रेंडिंगमध्ये येऊ लागले आहे. सिंग सोशल मीडियावरही सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे ४,१४५ फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवरील त्याचे बहुतेक व्हिडिओ अध्यात्म, पुनरुत्थान आणि मानवतेचे पुनरुत्थान, भविष्य आणि विनाश, ध्यान आणि भक्ती चळवळ अशा विषयांवर आहेत.
हेही वाचा :
तुकोबांच्या निवडक अभंगांना स्वरसाज