दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने डिसेंबर, २०२४ या महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची निवड केली आहे. नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेत प्रभावी कामगिरी केल्याबद्दल बुमराहला ‘आयसीसी प्लेयर ऑफ दि मंथ’ म्हणून गौरवण्यात आले. (Jasprit)
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेमध्ये बुमराहने पाच कसोटींत १४.२२ च्या सरासरीने ३२ विकेट घेतल्या होत्या. या मालिकेतील दोन कसोटीत त्याने भारताचे नेतृत्वही केले. तो या मालिकेचा मालिकावीर ठरला होता. याच मालिकेदरम्यान त्याने कसोटी कारकिर्दीतील २०० बळींचा टप्पाही पूर्ण केला. २० पेक्षा कमी सरासरीने २०० कसोटी विकेट घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. या सर्व कामगिरीमुळे त्याची निवड डिसेंबरचा ‘प्लेयर ऑफ दि मंथ’ म्हणून करण्यात आली आहे. (Jasprit)
बुमराह २०२४ मध्ये दुसऱ्यांदा आयसीसीचा ‘प्लेयर ऑफ दि मंथ’ ठरला आहे. यापूर्वी, जून, २०२४ मध्येही त्याला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले होते. त्यावेळी, टी-२० वर्ल्ड कपमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे तो या गौरवाचा मानकरी ठरला होता. आयसीसीने २०२१पासून प्लेयर ऑफ दि मंथ जाहीर करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत पुरुष क्रिकेटमध्ये भारताच्या ८, तर महिला क्रिकेटमध्ये ३ खेळाडूंना प्लेयर ऑफ दि मंथ म्हणून गौरवण्यात आले आहे. २०२४ मध्ये बुमराहव्यतिरिक्त यशस्वी जैस्वालही फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता. आयसीसीने जाहीर केलेल्या २०२४च्या वार्षिक पुरस्कारांच्या नामांकनांमध्ये बुमराहला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि सर्वोत्कृष्ट कसोटीपटू अशा दोन विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत. (Jasprit)
Say hello 👋 to the ICC Men’s Player of the Month for December 2024! 🔝
A round of applause for Jasprit Bumrah! 👏 👏 #TeamIndia pic.twitter.com/2ZpYHVv2L1
— BCCI (@BCCI) January 14, 2025
हेही वाचा :
रोहितचे ‘बॅक टू बेसिक्स’!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर