कोल्हापूर : प्रतिनिधी : राजस्थानहून कोल्हापुरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १० किलो ८७ ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत दोन लाख १७४० रुपये इतकी आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. (Two arrested)
एलसीबीचे हवालदार विशाल खराडे यांना गोपनीय माहितीदारांकडून मोरेवाडी चौकातील हॉटेल ड्रीमलँडमध्ये दोन व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार आहेत, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचला. हॉटेल ड्रीमलँडजवळ दोन व्यक्ती आल्या. एकाच्या हाता सॅक होती तर दुसऱ्याच्या हातात प्रवासी बॅग होती. त्यांच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून दोघांना पकडले. सुरवातीला त्यांनी उडवाउडवाची उत्तर दिले. त्यांच्याकडील बॅगांची तपासणी केली असता गांजा मिळून आला. कैलाससिंह उदयसिंह राजपूत (वय २२) आणि किशनसिंह दौलतसिंह राजपूत (२१, दोघे रा. जालोकी मंदार, जि.राजसमंद, राजस्थान) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याजवळील गांजा, दोन मोबाईल हॅण्डसेट जप्त केले.(Two arrested)
पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनासाठी सहायक पोलिस निरीक्षक चेतन मसुगटे, पोलिस हवालदार विशाल खराडे, वैभव पाटील, संतोष बरगे, अशोक पोवार, परशुराम गुजरे, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, गजानन गुरव, राजू येडगे, प्रविण पाटील, कृष्णात पिंगळे, शिवानंद मठपती, नामदेव यादव, महादेव कुराडे, सुशील पाटील यांचा कारवाईत सहभाग होता.
हेही वाचा :
गोळी सुटली, आमदाराच्या डोक्यात घुसली…