Home » Blog » convocation : शिवाजी विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा शुक्रवारी

convocation : शिवाजी विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा शुक्रवारी

डॉ. आशीष लेले प्रमुख पाहुणे

by प्रतिनिधी
0 comments
convocation

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त सोहळा शुक्रवारी, १७ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात सकाळी अकरा वाजता होणार आहे. राज्यपाल आणि कुलपती सी. पी. राधाकृष्णन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशीष लेले प्रमुख प्राहुणे असतील. (convocation)

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के आणि प्र कुलगुरू प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दीक्षान्त सोहळ्यानिमित्त गुरुवारी, १६ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता ग्रंथ दिंडी आणि ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. (convocation)

सकाळी आठ वाजता कमला कॉलेज येथून ग्रंथदिंडी सुरू होणार आहे. कमला कॉलेज, राजारामपुरी, आईचा पुतळा, सायबर चौक, मार्गे राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात दिंडीचे विसर्जन होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महोत्सवात दुर्मिळ ग्रंथांसह नामवंत लेखकांची पुस्तके आणि ग्रंथ मांडण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

बालनाट्य स्पर्धा १३ जानेवारीपासून

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00