Home » Blog » Children’s Drama : बालनाट्य स्पर्धा १३ जानेवारीपासून

Children’s Drama : बालनाट्य स्पर्धा १३ जानेवारीपासून

कोल्हापूरसह १० केंद्रांवर होणार स्पर्धा

by प्रतिनिधी
0 comments
Children's Drama

कोल्हापूर : राज्य बाल नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यात १० वेगवेगळ्या केंद्रांवर होत आहे. कोल्हापूर केंद्रावर १३ जानेवारीपासून स्पर्धा सुरू होणार आहेत. (Children’s Drama)

सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.(Children’s Drama)

कोल्हापूर – सांगली हे विभागून केंद्र असल्याने, १३ ते १७ जानेवारी दरम्यान राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे तसेच १८ ते २२ जानेवारी पर्यंत सांगली येथे एकूण ४४ नाट्य संस्थांची बालनाट्ये सादर होतील. गेली २० वर्षे ही बालनाट्य स्पर्धा सुरू आहे. दिवसाला चार ते पाच बालनाट्याचे प्रयोग सादर होणार आहेत. सकाळी ९ वा. ते दुपारी ४ वा. पर्यंत प्रयोग सादर होणार आहेत, जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00