14
सिडनी : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील सिडनी कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशीच्या खेळाची ठळक वैशिष्ट्ये ठरलेल्या आकड्यांवर टाकलेली ही नजर. (India stats)
- ३२ – जसप्रीत बुमराहने या मालिकेत आतापर्यंत ३२ विकेट घेतल्या आहेत. याबरोबरच, तो परदेशी भूमीवर एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने बिशनसिंग बेदींचा विक्रम मोडला. बेदी यांनी १९७७-७८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३१ विकेट घेतल्या होत्या. (India stats)
- ४५ – सिडनी क्रिकेट ग्राउंडवर तब्बल ४५ वर्षांनी दोन्ही संघांनी पहिल्या डावामध्ये २०० धावांचा टप्पा ओलांडण्यात अपयश आले. यापूर्वी १९८० साली या मैदानावर झालेल्या ऑस्ट्रेलिया-इंग्लंड कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा डाव १२३ धावांत, तर इंग्लंडचा डाव १४५ धावांत आटोपला होता. (India stats)
- २९ – रिषभ पंतने शनिवारी २९ धावांत अर्धशतक ठोकले. भारतातर्फे कसोटीत झळकावलेले हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक आहे. भारतातर्फे सर्वांत वेगवान कसोटी अर्धशतकाचा विक्रमही रिषभच्याच नावावर असून त्याने २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध बेंगळुरू कसोटीत २८ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.
- १० – २०२४-२५ च्या मोसमात विराट कोहलीला दहाव्यांदा धावांचा दुहेरी आकडा गाठता आला नाही. आघाडीच्या सात फलंदजांमध्ये संपूर्ण कसोटी मोसमात दहावेळा एकेरी धावा करणारा कोहली हा केवळ दुसरा फलंदाज आहे. कोहलीशिवाय केवळ रोहित शर्माने या मोसमात दहावेळा एकेरी धावा केल्या आहेत.
Fiery scenes in the final over at the SCG!
How’s that for a finish to Day One 👀#AUSvIND pic.twitter.com/BAAjrFKvnQ
— cricket.com.au (@cricketcomau) January 3, 2025
हेही वाचा :