Home » Blog » Rape and Murder : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या

Rape and Murder : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या

कल्याणमधील नराधमासह पत्नीलाही अटक

by प्रतिनिधी
0 comments
rape and murder

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यात महिला व अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटना वाढतच राहिल्या आहेत. कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन त्याची निर्घृण हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नराधम विशाल गवळीला त्याच्या पत्नीने मदत केली होती. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून या कृत्यामुळे परिसरातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नराधम गवळीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे. (Rape and Murder)

कल्याणमधील एका सोसायटीत राहत असलेली मुलगी मंगळवारी दुपारी घरातून बाहेर पडली होती.  ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. शोध घेऊनही ती न सापडल्याने कुटुंबीयांनी पोलिसाकडे तक्रार केली.  रात्री उशिरा शोध सुरू केला असता परिसरातील कबरस्तानांमध्ये एका बालिकेचा मृतदेह सापडला. तपासात तो बेपत्ता झालेल्या मुलीचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. (Rape and Murder)

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी विशाल गवळीची पत्नी साक्षी गवळी हिला ताब्यात घेतले. तिच्याकडे कसून तपास केला असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिचा नवरा विशाल गवळीने बालिकेचे अपहरण केले. तिला घेऊन तो घरी आला.  तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. त्याची पत्नी साक्षी ही सायंकाळी कामावरून परत आली असता तिला त्याने हा प्रकार सांगितला. त्यावेळी दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबत कट रचला. मृतदेह एका बॅगेत भरून कब्रस्तानात निर्जन ठिकाणी टाकला. घरातील रक्ताचे डाग पुसून कापड फेकून दिले. त्यानंतर विशाल गवळी पळून गेला.  साक्षीकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने पथक रवाना केले. विशाल गवळीला शेगाव येथून अटक करण्यात आली आहे.(Rape and Murder)
विशाल गवळी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत साक्षी गवळी ही तिची तिसरी पत्नी असल्याचे तपासातून समोर आले आहे. बालिकेवरील अत्याचारामुळे परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नराधम गवळीला फासावर लटकवा किंवा बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे जसे एन्काऊंटर करण्यात आले तसाच त्याचाही एन्काऊंटर करावा अशी मागणी पीडितेचे पालक व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा : 

‘लुटारू नवरी’चे श्रीमंतांवर जाळे
भूतबाधेची भिती दाखवून वृध्देला लुटणाऱ्या दोन मुलांना अटक

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00