Home » Blog » Border-Gavaskar Trophy : रोहित सलामीला; राहुल तिसऱ्या स्थानी

Border-Gavaskar Trophy : रोहित सलामीला; राहुल तिसऱ्या स्थानी

भारत-ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी आजपासून

by प्रतिनिधी
0 comments
Border-Gavaskar Trophy

मेलबर्न : बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतील चौथ्या सामन्यास गुरुवारपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरुवात होत आहे. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा सलामीला, तर लोकेश राहुल तिसऱ्या स्थानी फलंदाजीस येण्याची शक्यता आहे. (Border-Gavaskar Trophy)

पाच कसोटींच्या या मालिकेत सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान १-१ अशी बरोबरी आहे. पर्थमध्ये भारताने बाजी मारल्यानंतर ॲडलेड कसोटी जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेत बरोबरी साधली. ब्रिस्बेन येथील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली होती. मागील दोन कसोटींपासून सहाव्या स्थानी फलंदाजीस येणाऱ्या रोहितला मधल्या फळीमध्ये विशेष कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे, मेलबर्नमध्ये तो पुन्हा सलामीस येण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, त्याच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या राहुलने मालिकेत आतापर्यंत स्वत:चा ठसा उमटवला आहे. तो या कसोटीत तिसऱ्या स्थानावर फलंदाजीस येऊ शकतो. सध्या तिसऱ्या स्थानावरील शुभमन गिल सातत्याने अपयशी ठरत असल्यामुळे त्याला मधल्या फळीत खालच्या स्थानावर फलंदाजीस पाठवण्यात येईल. मेलबर्नच्या खेळपट्टीचा विचार करता या कसोटीत भारताकडून दोन फिरकीपटू खेळवण्याचाही विचार होऊ शकतो. (Border-Gavaskar Trophy)
दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघातर्फे १९ वर्षीय सॅम कॉन्स्टास मेलबर्न कसोटीद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. तिसऱ्या कसोटीनंतर सलामीवीर नॅथन मॅकस्विनीला वगळून त्याच्याजागी कॉन्स्टासला संघात स्थान देण्यात आले होते. त्याचप्रमाणे, जोश हेझलवूड दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला असून त्याची जागा स्कॉट बोलंड भरून काढेल. (Border-Gavaskar Trophy)
भारताची मागील तीन ऑस्ट्रेलिया दौऱ्यांमधील या मैदानावरील कामगिरी दोन विजय व एक अनिर्णित अशी आहे. आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला या मैदानावर सलग तिसरा विजय नोंदवावा लागणार आहे. (Border-Gavaskar Trophy)

  • महत्त्वाचे
    – बुमराहला २०० कसोटी बळींचा टप्पा पूर्ण करण्यासाठी आणखी ६ विकेटची आवश्यकता आहे. मेलबर्न कसोटीमध्ये त्याने हा टप्पा गाठल्यास तो रविचंद्रन अश्विननंतर सर्वांत कमी सामन्यांमध्ये (४४) २०० विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरेल.
    – २०१८-१९च्या मोसमापासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर केवळ सहा कसोटी शतके झळकावण्यात आली आहेत. या काळात एकापेक्षा अधिक कसोटी खेळवण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियातील स्टेडियममध्ये झळकावण्यात आलेली ही सर्वांत कमी शतके आहेत.

हेही वाचा :

भारताची विक्रमांसह विजयी आघाडी

बुमराहची सर्वोच्च गुणांशी बरोबरी

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00