मुंबई : पुढील महिन्यात मलेशियामध्ये रंगणाऱ्या १९ वर्षांखालील महिला टी-२० वर्ल्ड कपसाठी मंगळवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. निकी प्रसादकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून आशिया संघ जिंकणाऱ्या भारतीय संघातील बहुतांश खेळाडूंची वर्ल्ड कपसाठीही निवड करण्यात आली आहे. (World Cup Squad)
क्वालालंपूर येथे दोन दिवसांपूर्वीच भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव करून १९ वर्षांखालील महिला आशिया कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेली सलामी फलंदाज जी. त्रिशा ही दुसऱ्यांदा एकोणीस वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्यासह वेगवान गोलंदाज शबनम शकील आणि सोनम यादव यासुद्धा कारकिर्दीतील दुसरा अंडर-१९ वर्ल्ड कप खेळतील. या वर्षी विमेन्स प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) लिलावामध्ये सर्वाधिक रकमेचा करार मिळवणारी जी. कमलिनी हिचासुद्धा भारतीय संघात समावेश आहे. (World Cup Squad)
मलेशियामध्ये १८ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान हा वर्ल्ड कप रंगणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये १६ संघांचा सहभाग असून त्यांची विभागणी चार गटांमध्ये करण्यात आली आहे. ‘ग्रुप ए’मध्ये भारतासह मलेशिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. भारताचा स्पर्धेतील सलामीचा सामना १९ जानेवारी रोजी वेस्ट इंडिजशी होईल. त्यानंतर, भारत २१ जानेवारी रोजी मलेशियाशी, तर २३ जानेवारी रोजी श्रीलंकेशी झुंजणार आहे. गतविजेत्या भारतीय संघाने आशिया कपमध्ये अपराजित राहून विजेतेपद पटकावल्यानंतर आगामी वर्ल्ड कपमध्येही भारताला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. (World Cup Squad)
संघ : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके, जी. त्रिशा, जी. कमलिनी, भाविका अहिरे, ईश्वरी अवसारे, मिथिला विनोद, व्ही. जे. जोशिता, सोनम यादव, परुणिका सिसोदिया, केसरी द्रुती, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एम. डी. शबनम, वैष्णवी एस.
राखीव – नंदना एस., इरा जे, अनादी टी.
हेही वाचा :