मुंबई, विशेष प्रतिनिधी : राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, काही भागात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज घेऊन नियोजन करावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. (Rain)
२६ डिसेंबरला कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, २७ डिसेंबरला खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २८ डिसेंबरला खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.
या भागातील शेतकऱ्यांनी कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. (Rain)
हेही वाचा :
- भागवत संघाचे नेतृत्व करतात, हिंदू धर्माचे नाही
- हिमाचलमध्ये हजारो वाहने अडकली, जोरदार बर्फवृष्टी
- कॅलिफोर्नियात ड्रग माफीया सुनील यादवची हत्या