Home » Blog » vehichle stucks: हिमाचलमध्ये हजारो वाहने अडकली, जोरदार बर्फवृष्टी

vehichle stucks: हिमाचलमध्ये हजारो वाहने अडकली, जोरदार बर्फवृष्टी

हजारवर पर्यटकांची सुखरूप सुटका

by प्रतिनिधी
0 comments
himachal

नवी दिल्ली : हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. त्यामुळे मनालीमध्ये अनेक वाहने अडकली आहेत. पर्यटक सोलंग आणि अटल बोगदा, रोहतांग दरम्यान अनेक तास अडकून पडले होते. सुमारे एक हजार वाहनांची लांबच लांब लागली होती. पोलिसांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. एक हजार पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या सर्व पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. (vehichle stucks)

बर्फवृष्टी सुरू असल्याने पर्यटक आणि वाहनचालकांना त्यांची वाहने सुखरूप बाहेर पडतील, यासाठी पोलिस कर्मचारी मदत करत आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनीही बचाव कार्याबाबत समन्वय साधला. हिमाचलमध्ये बर्फवर्षाव सुरू आहे. येथील बर्फाच्छादित पर्वतांमध्ये ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे आधीच बिकट झालेल्या परिस्थितीत आणखी भर पडली. सीमला परिसरही बर्फाच्या चादरीत अच्छादून गेला आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ तिकडेही वाढला. त्यामुळे शहरात उत्साह ओसंडून वाहन आहे.(vehichle stucks)

गेल्या ८ डिसेंबर रोजी झालेल्या पहिल्या बर्फवृष्टीनंतर दोन आठवड्यांनी पुन्हा सुरू झालेल्या मोहक हिमवृष्टीने केवळ पर्यटकांसाठीच आनंदाची पर्वणी मिळालेली नाही तर स्थानिक पर्यटन उद्योगाचा उत्साहही वाढवला आहे. कोविडमुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे.(vehichle stucks)

बर्फाच्छादित टेकड्यांच्या सौंदर्याने मोहित झालेले पर्यटक आपला मुक्कामही वाढवत आहेत. या अनपेक्षित हिमवृष्टीने “व्हाइट ख्रिसमस” ची स्वप्ने पाहणाऱ्यांचा उत्साह वाढवला आहे. शिमल्याच्या हिवाळ्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटकांनी आपला मुक्काम वाढवला आहे.

हरियाणातील रेवाडी येथील हेमंत यांनी असा हिमवर्षाव होईल, असे वाटले नव्हते. पण पहिल्यांदाच असे सुंदर आणि आश्चर्यकारक दृश्य अनुभवत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. सकाळी आम्ही उठलो तेव्हा समोर सगळा बर्फच बर्फ दिसत होता. आम्ही परत जाण्याचा विचार केला होता, पण आता आम्ही आणखी काही काळ राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी पाहिलेला हा पहिला हिमवर्षाव आहे आणि हा माझ्यासाठी आयुष्यभराचा सुंदर अनुभव आहे, असे ते म्हणाले.

फरिदाबाद येथील पर्यटक प्रमोद योगी यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या. हे दृश्य केवळ अवर्णनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

“हिमवर्षावामुळे जो आनंद झाला तो शब्दातीत आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच निसर्गाचे विलोभनीय आणि आश्चर्यकारक सौंदर्य अनुभवत आहे. प्रत्येकाने किमान एकदा तरी या ठिकाणाला भेट देऊन आनंद लुटला पाहिजे. हिमवर्षावाचा हा अनुभव खूपच रोमांचकारी होता.”

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00