Home » Blog » pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अंतरिम संरक्षणही रद्द; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

by प्रतिनिधी
0 comments

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. तसेच यापूर्वी दिलेले अंतरिम संरक्षणही रद्द केले. (pooja khedkar)

न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांनी खेडकरची याचिका फेटाळताना, यूपीएससी ही प्रतिष्ठित संस्था आहे. अशी प्रतिष्ठीत संस्था आणि समाज या दोघांचीही फसवणुकीचा हा प्रकार आहे. या कटाचा उलगडा करण्यासाठी चौकशीची गरजही न्यायालयाने व्यक्त केली.(pooja khedkar)

प्रथमदर्शनी या प्रकरणात खेडकर यांचे कृत्य संस्थेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने केल्याचे दिसते. बनावट कागदपत्रांच्या आधारे फायदे घेण्याचा खेडकरला अधिकार नाही, अशी टिपणीही न्यायालयाने केली.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00